टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांनाही पदोन्नती
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एनसीटीईकडून 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांसाठी प्राथमिकस्तरावरून उच्च प्राथमिकस्तरावर पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. परंतु, राज्य सरकारकडून एनसीटीईच्या आदेशाची पायमल्ली करण्यात येत असून, टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांना देखील पदोन्नती दिली जात असल्याचा आरोप शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
नगरहून पुण्याला जाणार्या लालपरी हाऊसफुल्ल !
पुणे : पीएच.डी. मार्गदर्शकांसाठी सुधारित नियमावली
डाव्या हातावरच का बांधतात घड्याळ? जाणून घ्या
6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे. हे प्राथमिक शिक्षण देणार्या शिक्षकांकडे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निर्धारित केलेली किमान पात्रता असणे बंधनकारक आहे. मुलांना कोणत्याही अपात्र शिक्षकांनी शिकवू नये, हा त्यामागील हेतू आहे. ही पात्रता शिक्षकांच्या पदोन्नतीसाठीसुद्धा बंधनकारक आहे. परंतु राज्यात हजारो शिक्षकांना अशी पात्रता नसताना सहावी ते आठवी गणित-विज्ञान विषय शिक्षकपदी पदोन्नती देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एकाच वेळी राज्यातील मुले आणि शिक्षक भरतीची वर्षानुवर्षे वाट पाहणारे व प्रत्यक्ष टीईटी उत्तीर्ण असणारे उमेदवार यांच्यावर अन्याय होत आहे.
राज्यातील टीईटी पात्र बेरोजगार उमेदवार अनेक दिवसांपासून सेवांतर्गत शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक करण्याची मागणी करत होते. त्यावर एनसीटीईने 16 नोव्हेंबर 2023 च्या पत्राद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. या पत्रामध्ये 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांनासुद्धा पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.
एनसीटीईने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार शालेय शिक्षण विभागाने त्वरित कार्यवाही करावी. ज्या शिक्षकांकडे एनसीटीईने बंधनकारक केलेली किमान पात्रता नाही अशा शिक्षकांना त्यांच्या मूळ पदावर पदावनत करावे व सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीमधून या जागा भरण्यात याव्यात.
– तुषार कुंभार, अभियोग्यताधारक
शिक्षक पात्रता परीक्षा ही बालकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणारे प्रमुख कवच आहे. प्रशासनाने धोरणकर्त्यांचा, शिक्षक पात्रता परीक्षा ही नवीन पात्रता शिक्षकांना अनिवार्य करण्यामागचा हेतू व उद्देश समजून घेऊन त्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा योग्य त्या सर्वस्तरावर लागू करण्यासाठी तत्काळ पावले उचलणे बालकांच्या हितासाठी
गरजेचे आहे.
– सचिन भराटे, अभियोग्यताधारक
The post टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांनाही पदोन्नती appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एनसीटीईकडून 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांसाठी प्राथमिकस्तरावरून उच्च प्राथमिकस्तरावर पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. परंतु, राज्य सरकारकडून एनसीटीईच्या आदेशाची पायमल्ली करण्यात येत असून, टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांना देखील पदोन्नती दिली जात असल्याचा आरोप शिक्षक भरतीसाठी …
The post टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांनाही पदोन्नती appeared first on पुढारी.