
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अयोध्येत सोमवार, २२ जानेवारी राेजी मोठ्या उत्साहात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्तीची राम मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा झाला. मूर्तीकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या रामलल्ला मूर्तीचे प्रसिद्ध जागतिक वाळू शिल्पकार ‘सुदर्शन पटनायक’ यांनी देखील कौतुक केले आहे. (Arun Yogiraj on Sudarsan Pattnaik)
तुम्हाला खरोखर भगवान विश्वकर्माचे वरदान…
रामलल्ला मूर्ती शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रशंसा जागतिक दर्जाचे वाळू शिल्पकार ‘सुदर्शन पटनायक’ यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून केलेल्या पाेस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘अरुण योगीराज’ जी तुम्हाला खरोखर भगवान विश्वकर्माचे वरदान लाभले आहे. एक कलाकार म्हणून भगवान राम लल्लाचे तुमचे शिल्प माझ्यासाठी हृदयस्पर्शी आहे. प्रभू रामाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. जय श्री राम. (Arun Yogiraj on Sudarsan Pattnaik)
माझ्यासाठी खूप मोलाचे : अरुण योगीराज
प्रिय महोदय, जगातील एका प्रसिद्ध वाळू कलाकाराची प्रशंसा मिळणे हे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. हे मला माझ्या कलेच्या क्षेत्रात अधिक काम करण्यास नक्कीच प्रेरित करेल, असे म्हणत अरुण योगीराज यांनी जागतिक दर्जाचे वाळू शिल्पकार ‘सुदर्शन पटनायक’ यांचे आभार मानले आहेत. (Arun Yogiraj on Sudarsan Pattnaik)
Dear sir, receiving an appreciation from one of the renowned sand artist of the world means a lot to me… This will definitely motivate me to do more in my field of art….. https://t.co/8nhm657UTF
— Arun Yogiraj (@yogiraj_arun) January 28, 2024
हेही वाचा:
Ram Mandir PranPrathistha: ‘मी पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती…’ : शिल्पकार अरुण योगीराज
Ayodhya Ram Mandir : …तेव्हा डोळ्यात अँटिबायोटिक्स घालून शिल्पकार अरुण यांनी घडविली मूर्ती
Ayodhya Ram Mandir Inauguration : चर्चेतील चेहरा : अरुण योगीराज
‘सोन्याचा मुकुट, हार आणि धनुष्य…’ प्राणप्रतिष्ठावेळचा रामलल्लाचा मनमोहक शृंगार
Latest Marathi News ‘हे माझ्यासाठी खूप मोलाचे…’ रामलल्ला मूर्तीकार योगीराज यांची पोस्ट चर्चेत Brought to You By : Bharat Live News Media.
