जितेंद्र कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा; ‘या’ दिवशी भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता जितेंद्र कुमार यांचा ‘लंतरानी’ ( Lantrani Movie ) हा नविन चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गुरविंदर सिंग करणार आहेत. यात बॉलिवूड अभिनेता जॉनी लिव्हरही दिसणार आहे. यामुले चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संबंधित बातम्या  Bigg Boss 17 Winner : ‘बिग बॉस 17’ चा … The post जितेंद्र कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा; ‘या’ दिवशी भेटीला appeared first on पुढारी.
जितेंद्र कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा; ‘या’ दिवशी भेटीला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता जितेंद्र कुमार यांचा ‘लंतरानी’ ( Lantrani Movie ) हा नविन चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गुरविंदर सिंग करणार आहेत. यात बॉलिवूड अभिनेता जॉनी लिव्हरही दिसणार आहे. यामुले चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संबंधित बातम्या 

Bigg Boss 17 Winner : ‘बिग बॉस 17’ चा विजेता ठरणार आज; मुनावर फारुकी जिंकणार ट्राफी?
Bigg Boss 17 : अभिषेक-ईशा मालवीय यांच्यातील वाद टोकाला, नको ते केले आरोप
Big Boss 17 : विकीसोबतचा लिपलॉक पाहताच कंगनाचा अंकिताला सल्ला (video)

अभिनेता जितेंद्र कुमार यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर ‘लंतरानी’ ( Lantrani Movie ) चित्रपटातील एक फोटो शेअर केलाय. या फोटोत त्याच्यासोबत आणखी तगडे दोन स्टार्स दिसत आहेत. याशिवाय हॉस्पिटलमधील, दुचाकीवरील काही सीनही दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमधून त्यांनी हा चित्रपट येत असल्याची घोषणा केली आहे. ‘लंतरानी’ चित्रपटात तीन वेगवेगळ्या स्टार्सच्या तीन कथा पाहायला मिळणार आहेत. गुरविंदर सिंगच्या कथेत जितेंद्र कुमारसोबत जॉनी लिव्हर काम करणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्रित स्क्रिन शेअर करत आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘लंतरानी’ म्हणजे ‘मोठ्या- मोठ्या गोष्टी सांगणे’. या कथेत अनेक पात्र आहेत! मात्र, यापैकी खरी लंतराणी कोण?, हे ९ फेब्रुवारीला समोर येणार आहे. याशिवाय त्याच्या ‘ड्राय डे’ चित्रपटावर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि मला ‘लंतरणी’ मध्ये पाहून मला आणखीन आनंद झाला आहे. प्रेक्षक मला एका नव्या भूमिकेत पाहणार आहेत ज्यात भरपूर विनोद आहे. असेही त्यांनी म्हटलं आहे.
‘ड्राय डे’ मध्ये जितेंद्र कुमार ‘गन्नू’ च्या भूमिकेत दिसला होता. तो ‘टीव्हीएफ पिचर्स’, ‘टीव्हीएफ बॅचलर’, ‘टीव्हीएफ ट्रिपलिंग’, ‘कोटा फॅक्टरी’ आणि ‘पंचायत’ सारख्या वेब सीरिजमध्ये दिसला आहे. आता चाहत्यांना त्याच्या ‘लंतरानी’ चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे. हा चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Jitendra Kumar (@jitendrak1)

Latest Marathi News जितेंद्र कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा; ‘या’ दिवशी भेटीला Brought to You By : Bharat Live News Media.