पिंपरी : आयटी पार्कमध्ये तरुणीचा गोळ्या झाडून खून

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा प्रेम संबंधातून प्रियकराने तरुणीचा गोळ्या झाडून खून केला. हा प्रकार हिंजवडी येथे रविवारी (दि. २८) उघडकीस आला. पोलिसांनी संशयीत आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. वंदना द्विवेदी (रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ निगम (रा. उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषभ … The post पिंपरी : आयटी पार्कमध्ये तरुणीचा गोळ्या झाडून खून appeared first on पुढारी.

पिंपरी : आयटी पार्कमध्ये तरुणीचा गोळ्या झाडून खून

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा प्रेम संबंधातून प्रियकराने तरुणीचा गोळ्या झाडून खून केला. हा प्रकार हिंजवडी येथे रविवारी (दि. २८) उघडकीस आला. पोलिसांनी संशयीत आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. वंदना द्विवेदी (रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ निगम (रा. उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषभ निगम हा वंदना हिचा प्रियकर आहे. दोघेही एका आयटी कंपनीत कामाला होते. दरम्यान, शनिवारी (दि. २७) दोघे एका लॉजमध्ये गेले होते. तेथे रात्री उशिरा संशयीत आरोपीने वंदना हिच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर संशयीत आरोपी तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी संशयीताला मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
हेही वाचा : 

अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; जरांगेंची मोठी घोषणा

AUS vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा तब्बल 27 वर्षांनी ऑस्ट्रेलियावर विजय! डे-नाईट कसोटी 8 धावांनी जिंकली 
Dani Li Passes Away : स्लिम-ट्रिमचे फॅड ठरले जीवघेणे! लिपोसक्शन शस्त्रक्रियेने ‘या’ गायिकेचा मृत्यू  

Latest Marathi News पिंपरी : आयटी पार्कमध्ये तरुणीचा गोळ्या झाडून खून Brought to You By : Bharat Live News Media.