चंद्रपूर : ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी 8 जणांना अटक

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर महानगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख शिवा मिलिंद वझलकर यांचा खून झाला होता. या प्रकरणी 8 संशयीत आरोपींना अटक करण्यात आली. काल (शनिवार) न्यायालयात त्‍यांना हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 30 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. वैयक्तिक व किरकोळ वादातून हा खून झाल्याचे संशयीत आरोपी सांगत … The post चंद्रपूर : ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी 8 जणांना अटक appeared first on पुढारी.

चंद्रपूर : ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी 8 जणांना अटक

चंद्रपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर महानगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख शिवा मिलिंद वझलकर यांचा खून झाला होता. या प्रकरणी 8 संशयीत आरोपींना अटक करण्यात आली. काल (शनिवार) न्यायालयात त्‍यांना हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 30 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. वैयक्तिक व किरकोळ वादातून हा खून झाल्याचे संशयीत आरोपी सांगत असल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली आहे.
हिमांशू कुमरे, स्वप्नील काशीकर, चैतन्य आस्कर, रिझवान पठाण, नाजीर शेख, रोहित पितरकर, सुमीत दाते, अनसार खान अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. तुकुम मार्गावरील छत्रपती नगरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस परिसरातील स्वप्नील काशीकर यांच्या कार्यालयासमोर अंतर्गत वादातून शिवा वझलकर यांचा खून करण्यात आल्याची घटना 25 जानेवारीला रात्री आठच्या सुमारास घडली होती.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आला. गुरूवारी रात्रीच या प्रकरणी तिघांना अटक केली. शुक्रवारी रात्री तीन, तर शनिवारी सकाळी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती रामनगर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर खेखाळे यांनी दिली आहे.
हेही वाचा : 

Nitish Kumar Resign : नितीश कुमारांचा राजीनामा, कॉंग्रेस अध्यक्ष म्‍हणाले… 
Nitish Kumar Bihar: बिहारच्‍या मुख्‍यमंत्रीपदी पुन्‍हा नितीशकुमारच, दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेणार 
सर्व शाळेत पहिली ते दहावी मराठी विषय सक्‍तीचा करा : राज ठाकरे  

Latest Marathi News चंद्रपूर : ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी 8 जणांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.