अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत आणि सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत मराठा आंदोलन सूरूच राहणार आहे. गावागावात नोंदी तपासण्यासाठी टीम तयार करणार असून पहिलं प्रमाणपत्र मिळालं की, विजयी सभा घेणार, अशी घोषणा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. रविवारी (दि.२८) अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी ते बोलत होते.
“मराठ्यांनी जागरूक रहावे. अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र रेकॉर्डबाबत विचारणा करा. सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. फक्त काढलेल्या अध्यादेशाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी आणि प्रमाणपत्रांचे वाटप व्हावे. पहिलं प्रमाणपत्र मिळालं की विजयी सभा घेऊ. अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा :
सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय मतासाठी नाही तर… : मुख्यमंत्री
शिवरायांची घेतलेली शपथ मी पूर्ण केली : मुख्यमंत्री शिंदे
अखेर जरांगेंच्या लढ्याला यश; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले
…तर पुन्हा आझाद मैदानात येणार : जरांगे पाटील
Latest Marathi News अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार Brought to You By : Bharat Live News Media.
