कवठेमहांकाळ : दुचाकी शोरूमला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

सांगली : Bharat Live News Media वृत्तसेवा कवठेमहांकाळ येथे नवीन बस स्टँड समोर होंडा शोरूमला भीषण आग लागली. या दुर्घटणेत नवीन जुन्या मोटर सायकली जळून खाक झाल्या. या दरम्यान शेजारच्या महालक्ष्मी स्वीट मार्ट व चार-पाच दुकानांनाही आग लागली. या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. या परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट हवेत पसरू लागल्याने नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे या परिसरात नागरिकांची गर्दी झाली.
यावेळी हा परिसर धुराने व्यापलेला होता. दरम्यान अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा :
Dani Li Passes Away : स्लिम-ट्रिमचे फॅड ठरले जीवघेणे! लिपोसक्शन शस्त्रक्रियेने ‘या’ गायिकेचा मृत्यू
Nitish Kumar Bihar: बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीशकुमारच, दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेणार
Bigg Boss 17 Winner : ‘बिग बॉस 17’ चा विजेता ठरणार आज; मुनावर फारुकी जिंकणार ट्राफी?
Latest Marathi News कवठेमहांकाळ : दुचाकी शोरूमला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान Brought to You By : Bharat Live News Media.
