नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर कॉंग्रेस अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया,”आम्हाला पहिल्यापासूनच…”

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) सर्वेसर्वा नितीशकुमार (Nitish Kumar Resigns) यांनी आज (दि.२८) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून सुरू चर्चेला पूर्णविराम देत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (रालोआ) सहभागी होण्याचा निर्णय त्‍यांनी घेतला आहे. यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Nitish Kumar Resign) Nitish Kumar Resign … The post नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर कॉंग्रेस अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया,”आम्हाला पहिल्यापासूनच…” appeared first on पुढारी.
नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर कॉंग्रेस अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया,”आम्हाला पहिल्यापासूनच…”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) सर्वेसर्वा नितीशकुमार (Nitish Kumar Resigns) यांनी आज (दि.२८) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून सुरू चर्चेला पूर्णविराम देत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (रालोआ) सहभागी होण्याचा निर्णय त्‍यांनी घेतला आहे. यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Nitish Kumar Resign)
Nitish Kumar Resign : आज ते खरे ठरले…
नितीशकुमार यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी ट्वीटसह व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,” ‘आयाराम-गयाराम’ सारखे असे अनेक लोक देशात आहेत. पहिले ते आणि आम्ही  एकत्र लढत होतो. मी लालूजी आणि तेजस्वी यांच्‍याशी बोललो तेव्हा त्यांनीही नितीशजी साथ साेडणार असल्याचे त्‍यांनी सांगितले. त्यांना राहायचे असते तर ते राहिले असते; पण त्यांना जायचे आहे. आम्हाला हे आधीच माहीत होते; पण इंडिया युती अबाधित ठेवण्यासाठी आम्ही काहीही बोललो नाही. आम्ही काही चुकीचे बोललो तर चुकीचा संदेश जाईल. लालू प्रसाद यादवजी आणि तेजस्वी यादवजी यांनी आम्हाला आधीच ही माहिती दिली होती. आज ते खरे ठरले.”
आता पाचव्यांदा ‘यू टर्न’
७२ वर्षीय नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणातील ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात. २०१३ पासून त्यांचे ‘एनडीए’ ते ‘यूपीए’ ते महागठबंधन असे चारवेळा ‘यू टर्न’ झाले आहेत. आधी ते ‘यूपीए’मध्ये होते. त्यानंतर त्यांनी ‘एनडीए’ची कास धरली. त्यानंतर तेथून बाहेर पडत महागठबंधनमध्ये प्रवेश केला. आतासुद्धा इंडिया आघाडीच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला; पण आता तेच पुन्हा ‘एनडीए’त परत जाण्याची शक्यता आहे.

देश में ‘आया राम-गया राम’ जैसे कई लोग हैं।
पहले वो और हम मिलकर लड़ रहे थे। जब मैंने लालू जी और तेजश्वी जी से बात की तो उन्होंने भी कहा कि नीतीश जा रहे हैं।
अगर वह रुकना चाहता तो रुक जाता लेकिन वह जाना चाहता है। इसलिए ये बात हमें पहले से ही पता थी, लेकिन इंडिया गठबंधन को… pic.twitter.com/pgjCISOFuV
— Mallikarjun Kharge (@kharge) January 28, 2024

हेही वाचा : 

नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; नव्या सरकारचा आजच शपथविधी
‘लग्न एकासोबत अन् अफेअर…’; काँग्रेस नेत्याचा नितीश कुमारांना टोला
बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, बैठकांचा सिलसिला
Bihar Politics Updates: ‘मी राजीनामा दिला…’ नितीशकुमार यांची पहिली प्रतिक्रीया; बिहारमधील ‘महायुती’ सरकार संपुष्ठात

Latest Marathi News नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर कॉंग्रेस अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया,”आम्हाला पहिल्यापासूनच…” Brought to You By : Bharat Live News Media.