‘बिग बॉस 17’ चा विजेता ठरणार आज; मुनावर फारुकी जिंकणार ट्राफी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले आज रविवारी (दि. २८ जानेवारी) रोजी होणार आहे. आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करणार आहेत. याचदरम्यान शोच्या विजेत्याची नावाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याचा नुकताच एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला … The post ‘बिग बॉस 17’ चा विजेता ठरणार आज; मुनावर फारुकी जिंकणार ट्राफी? appeared first on पुढारी.
‘बिग बॉस 17’ चा विजेता ठरणार आज; मुनावर फारुकी जिंकणार ट्राफी?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले आज रविवारी (दि. २८ जानेवारी) रोजी होणार आहे. आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करणार आहेत. याचदरम्यान शोच्या विजेत्याची नावाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याचा नुकताच एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या शोची ट्रॉफी मुनावर फारुकीची जिंकणार असल्याची माहिती गायक बादशहाने दिली आहे. मात्र, खरोखरंच या ट्राफीवर कोणाच्या नाव कोरले जाणार हे संध्याकाळी समजणार आहे. ( Bigg Boss 17 Winner )
संबंधित बातम्या 

Bigg Boss 17: फिनालेच्या स्पर्धेतून विक्की जैन बाहेर? टॉप ५ फायनलिस्ट पाहा
Bigg Boss 17 : अंकितासाठी सनी लिओनी खास पोस्ट; म्हणाली, ‘ऑल द बेस्ट मी तुझ्या…’
Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’ चा विजेता कोण होणार? ड्रामा क्विन राखीनं केली भविष्यवाणी (video)

‘बिग बॉस १७’ चे टॉप ५ फायनलिस्ट फिनालेच्या शर्यतीत बॉलिवूड अभिनेता अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे. आज हा शो आज संध्याकाळी सुरू होवून ६ तास चालणार असल्याचीही माहिती मिळत आहे. यामुळे ‘बिग बॉस १७’ चा विजेता कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विजेत्याला काय मिळणार?
एका रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, ‘बिग बॉस १७’ च्या विजेत्याला ३० ते ४० लाख रुपये दिले जाणार आहे. यासोबतच एक कारही भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा शो गेल्या १५ ऑक्टोबर रोजी प्रसारित होवून तो चार महिन्यांहून अधिक काळ चालला आहे. ( Bigg Boss 17 Winner )
मुनावर फारुकी होणार विजेता?
शोच्या फिनालेपूर्वी रॅपर बादशाहने मुनावर फारुकीला पाठिंबा दर्शवत इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या त्याने म्हटलं आहे की,”ठीक आहे, मला ते सांगायची गरज नाही, पण बिग बॉस १७मध्ये फक्त मुनव्वर जिंकणार आहे. वोट करा, कारण ट्रॉफी… आधीच माहित आहे.”
याच दरम्यान मुनवर फारुकी विजेता बनू शकतो असे म्हटलं जात आहे, कारण सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंडमध्ये तो मोठ्या फरकाने जिंकत आहे. तर अंकिता लोखंडे आणि अभिषेक कुमार टॉप २ मध्ये दिसत आहेत. मात्र, खरोखरं कोणाला विब बॉस १७ ची ट्राफी मिळणार हे रात्री समजणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by ColorsTV (@colorstv)

 

View this post on Instagram

 
A post shared by ColorsTV (@colorstv)

Latest Marathi News ‘बिग बॉस 17’ चा विजेता ठरणार आज; मुनावर फारुकी जिंकणार ट्राफी? Brought to You By : Bharat Live News Media.