पहिली ते दहावी मराठी विषय सक्‍तीचा करा : राज ठाकरे

मुंबई : पुढारी ऑनलाईन मी अत्‍यंत कडवट मराठी माणूस आहे. माझ्यावर संस्‍कारही कडवट मराठीचे झाले आहेत. मराठीसाठी अंगावर अनेक केसेस घेतल्‍या. महाराष्‍ट्रात मराठी सोडून हिंदी ऐकलं की त्रास होतो अशा भावना मनजे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्‍त केल्‍या. नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठी भाषा संपवण्याचं राजकारण महाराष्‍ट्रात सुरू आहे, … The post पहिली ते दहावी मराठी विषय सक्‍तीचा करा : राज ठाकरे appeared first on पुढारी.

पहिली ते दहावी मराठी विषय सक्‍तीचा करा : राज ठाकरे

मुंबई : Bharat Live News Media ऑनलाईन मी अत्‍यंत कडवट मराठी माणूस आहे. माझ्यावर संस्‍कारही कडवट मराठीचे झाले आहेत. मराठीसाठी अंगावर अनेक केसेस घेतल्‍या. महाराष्‍ट्रात मराठी सोडून हिंदी ऐकलं की त्रास होतो अशा भावना मनजे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्‍त केल्‍या. नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठी भाषा संपवण्याचं राजकारण महाराष्‍ट्रात सुरू आहे, हे दुर्देवी आहे. इतर भाषा शिका मात्र जिथं राहता तिथली भाषा ही शिकण्याला प्राधान्य द्‍या असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मराठी साहित्‍यप्रेमींशी संवाद साधला. देशात राष्‍ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही म्‍हणत त्‍यांनी हिंदी ही राष्‍ट्रभाषा नव्हे. यावेळी त्‍यांनी मराठी लोक बोलण्यात हिंदी का वापरतात? असा प्रश्न विचारला. राज्‍यातच मराठीला बाजुला सारण्याचा राजकीय प्रयत्‍न होत असल्‍याची खंत व्यक्‍त करत इतर भाषाही शिका मात्र जिथं राहता तिथली भाषा शिका अस ते म्‍हणाले.
देशाच्या पंतप्रधानांनाही त्‍यांच्या भाषेबद्दल ओढ
पंतप्रधानांना त्‍यांच्या राज्‍यावरचं प्रेम लपवता येत नाही, तर तुम्‍ही का लपवता असं ते म्‍हणाले. त्‍याचबरोबर महाराष्‍ट्रातच मराठी माणसांना घर नाकारलं जात असल्‍याच दु:ख त्‍यांनी व्यक्‍त केलं. बाहेरच्या राज्‍यात स्‍थानिकांना घर नाकारून दाखवा. महाराष्‍ट्रात भाषेवर जास्‍त लक्ष देण्याची गरज त्‍यांनी व्यक्‍त केली. भाषा मेली की सर्व संपलं. तुमची ओळख भाषेनं होते.
आम्‍ही दुसऱ्या भाषेत गरंगळत जातो. आपण समोरच्याला मराठीत बोलायची सवय लावून घेउ. समोरचा व्यक्‍ती मराठीत बोलताना चुकला तर हसू नका. कोणीही समोर येउ द्‍या, पण मराठीतचं बोला. मराठी भाषा, मराठी, महाराष्‍ट्र ही मराठी माणसाची ओळख आहे. प्रत्‍येक देश आपली भाषा, आपले नागरिक जपतो.
 
Latest Marathi News पहिली ते दहावी मराठी विषय सक्‍तीचा करा : राज ठाकरे Brought to You By : Bharat Live News Media.