‘मी राजीनामा दिला…’ नितीशकुमार यांची ‘इंडिया’ आघाडीला सोडचिठ्ठी

पुढारी ऑनलाईन डेस्क: बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयुचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी आज (दि.२८) सकाळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या राजीनामा सोपवला. यानंतर बिहारमध्ये ते पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करणार आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी दिल्याचे या निर्णयाने स्पष्ट झाले आहे. (Bihar Politics Updates) नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) विधिमंडळाची बैठक आज … The post ‘मी राजीनामा दिला…’ नितीशकुमार यांची ‘इंडिया’ आघाडीला सोडचिठ्ठी appeared first on पुढारी.
‘मी राजीनामा दिला…’ नितीशकुमार यांची ‘इंडिया’ आघाडीला सोडचिठ्ठी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयुचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी आज (दि.२८) सकाळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या राजीनामा सोपवला. यानंतर बिहारमध्ये ते पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करणार आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी दिल्याचे या निर्णयाने स्पष्ट झाले आहे. (Bihar Politics Updates)
नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) विधिमंडळाची बैठक आज (दि.२८) सकाळी पार पडली. दरम्यान त्यांनी या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. यानुसार आज नितीशकुमार यांनी बिहार राजभवनात राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त केला. (Bihar Politics Updates)
सरकारमध्ये सर्व काही ठीक नव्हते, म्हणून निर्णय- नितीशकुमार
यानंतर नितीशकुमार यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, “आज मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे आणि मी राज्यपालांनाही राज्यातील सरकार विसर्जित करण्यास सांगितले आहे” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही परिस्थिती उद्भवली कारण बिहार सरकारमध्ये सर्व काही ठीक नव्हते. मी सर्वांची मते मिळत होतो. मी पक्षातील सर्वांचे मत ऐकले आणि त्यानंतर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सरकार विसर्जित झाले असे देखील सध्याचे बिहारचे काळजीवाहून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. (Bihar Politics Updates)

#WATCH | Patna | Bihar outgoing CM and JD(U) president Nitish Kumar says, “Today, I have resigned as the Chief Minister and I have also told the Governor to dissolve the government in the state. This situation came because not everything was alright…I was getting views from… pic.twitter.com/wOVGFJSKKH
— ANI (@ANI) January 28, 2024

हेही वाचा:

Bihar Politics Crisis : …तरीही इंडिया आघाडी भक्कम; नितीशकुमार यांच्या निर्णयानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया
Nitish Kumar Resigns : नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; नव्या सरकारचा आजच शपथविधी
Bihar Politics: बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, बैठकांचा सिलसिला सुरू

Latest Marathi News ‘मी राजीनामा दिला…’ नितीशकुमार यांची ‘इंडिया’ आघाडीला सोडचिठ्ठी Brought to You By : Bharat Live News Media.