नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; नव्या सरकारचा आजच शपथविधी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Nitish Kumar Resigns : बिहारमधील राजकीय खेळ शिगेला पोहोचला आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून ते भाजपसोबत सरकार स्थापणार असल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी जेडीयूच्या आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देण्यासाठी राजभवनात गेले आणि त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला. संध्याकाळी चार वाजता ते नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे समोर आले आहे.
नितीश यांना रोखण्याची आरजेडीची रणनीती सध्या तरी कामी आलेली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही पाटणा येथे पोहोचले आहेत. शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आधी राजीनामा द्या, मग तुम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले जाईल अशी अट भाजपने नितीश कुमार यांच्यासमोर अट ठेवली होती.
Latest Marathi News नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; नव्या सरकारचा आजच शपथविधी Brought to You By : Bharat Live News Media.
