वाळू तस्करांची मुजोरी वाढली, थेट तलाठ्यावर जीवघेणा हल्ला
जळगाव : अमळनेर तालुक्यातील नाद्री ते दहिवद गावाच्या रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पथकाने अडवले असता वाळू वाहतूक करणाऱ्या सहा जणांकडून तलाठ्यास ट्रॅक्टर खाली ओढून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. याचबरोबर तलाठ्यास लाथा-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अमळनेर पोलिसांत तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अंमळनेर तालुक्यातील तलाठी संदीप रामदास शिंदे यांच्यासह चार जणांचे पथक अवैध गौण खनिज वाहतूक थांबवण्यासाठी नाद्री ते दहिवदया गावाच्या रस्त्यावर दहिवद येथे थांबलेल होते. त्यांनी योगेश पाटील यांना विना क्रमांकाचा स्वराज 744 हा ट्रॅक्टर एक ब्रास वाळू घेऊन जात असताना पकडला. त्यावेळेस पथकाला शिवीगाळ करून पळून जाऊन भूषण उर्फ सोनू राजेंद्र देवरे राहणार पातोंडा मोटरसायकलवर येऊन शासकीय कामात अडथळा आणून भूषण देवरे यांनी व त्याच्या सोबत असलेल्या लोकांनी ट्रॅक्टर खाली ओढून ट्रॅक्टर समोर-आडवे पाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तर काहींनी मारहाण केली म्हणून तलाठी संदीप शिंदे यांनी योगेश पाटील, भूषण देवरे व दोन अनोळखी इस्मानविरुद्ध अंमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करीत आहे.
हेही वाचा :
Nashik News : १० लाखांची खंडणी घेताना मुलासह कृषी अधिकारी जाळ्यात
हिंदू असल्याचा मला सार्थ अभिमान : रामास्वामी
डेटिंग अॅपद्वारे गंडा घालण्याचे प्रकार देशभरात वाढत चालले
The post वाळू तस्करांची मुजोरी वाढली, थेट तलाठ्यावर जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.
जळगाव : अमळनेर तालुक्यातील नाद्री ते दहिवद गावाच्या रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पथकाने अडवले असता वाळू वाहतूक करणाऱ्या सहा जणांकडून तलाठ्यास ट्रॅक्टर खाली ओढून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. याचबरोबर तलाठ्यास लाथा-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अमळनेर पोलिसांत तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली …
The post वाळू तस्करांची मुजोरी वाढली, थेट तलाठ्यावर जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.