अल्प आहार लाभदायक

आपले आरोग्य कसे सांभाळता येईल, हा प्रश्न प्रत्येकालाच भेडसावत असतो आणि ते सांभाळता यावे, यासाठी प्रत्येक जण अनेकपथ्ये पाळण्याचा प्रयत्न करत असतो. ( Small Diet Benefit ) संबंधित बातम्या  Makar Sankranti | भोगीची भाजी, बाजरीची भाकरी आरोग्यासाठी गुणकारी Health in Copper : आरोग्यातील तांब्याचे महत्त्व Seed therapy : आरोग्यपूर्ण राहण्यासाठी ‘सीड थेरेपी’ काही लोक व्यायाम … The post अल्प आहार लाभदायक appeared first on पुढारी.

अल्प आहार लाभदायक

डॉ. मनोज कुंभार

आपले आरोग्य कसे सांभाळता येईल, हा प्रश्न प्रत्येकालाच भेडसावत असतो आणि ते सांभाळता यावे, यासाठी प्रत्येक जण अनेकपथ्ये पाळण्याचा प्रयत्न करत असतो. ( Small Diet Benefit )
संबंधित बातम्या 

Makar Sankranti | भोगीची भाजी, बाजरीची भाकरी आरोग्यासाठी गुणकारी
Health in Copper : आरोग्यातील तांब्याचे महत्त्व
Seed therapy : आरोग्यपूर्ण राहण्यासाठी ‘सीड थेरेपी’

काही लोक व्यायाम करतात, काही फिरायला जातात तर काही लोक व्यायामशाळेत जाऊन तिथली निरनिराळी साधने वापरून आरोग्य रक्षणाचा प्रयत्न करतात. मात्र काही लोक कसलाही व्यायाम न करताही टुणटुणीत राहतात. ते जास्त जगतातसुद्धा आणि व्यायाम करणारे मात्र व्यायाम करूनसुद्धा आजारी पडतात. मग दीर्घ आयुष्य आणि निरामय जीवन यासाठी नेमके काय आवश्यक आहे, असा प्रश्न नेहमीच तज्ज्ञांना पडलेला असतो.
काही वर्षांपूर्वी ‘बीबीसी लंडन’ या वाहिनीच्या सायन्स शो या कार्यक्रमात डॉ. मायकेल मोस्ले यांनी यासंबंधात एक चांगला विचार मांडला होता. आपल्या आयुष्याची लांबी आणि आरोग्यविषयक दर्जा व्यायामापेक्षासुद्धा आपण काय, कधी आणि किती खातो यावर जास्त अवलंबून आहे, असे त्यांनी म्हटले होते. आपले शरीर किती ऊर्जा वापरते, याला आपल्या आयुष्यामध्ये सर्वाधिक महत्त्व आहे आणि या ऊर्जेची साठवण आणि विनियोग या दोन गोष्टींचा बारकाईने विचार केला, तर व्यायाम न करतासुद्धा आपल्या दीर्घ आणि निरामय आयुष्य लाभू शकते.
आपल्या शरीराची ऊर्जेची गरज अन्नातून पूर्ण होत असते. आपण भरपूर कष्ट केले की, आपल्या शरीरातील ऊर्जा खर्च होते. तिची भरपाई करण्यासाठी आहार घ्यावा लागतो. तो अधिक उष्मांकाचा असावा लागतो. तेव्हा आपण अधिक कष्ट करतो, अधिक थकतो, अधिक ऊर्जा खर्च करतो आणि अधिक आहार घेतो. तेव्हा उष्मांकाच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये भरपूर अन्न येते आणि ते पचवून ऊर्जा तयार करण्याच्या प्रक्रियेत शरीरामध्ये काही नवे बायप्रॉडक्ट तयार होतात, जे माणसाच्या शरीराला वृद्ध करत असतात.
ही प्रोसेस टाळून आपण कमी कष्ट, भरपूर विश्रांती आणि कमी उष्मांकाचे थोडे अन्न असा क्रम ठेवला तर आपल्या शरीरामध्ये अन्न कमी घेतले जाते आणि अन्नाचे रूपांतर ऊर्जेत करण्याची प्रक्रियाही कमी चालते. त्यामुळे वृद्धत्व निर्माण करणार्‍या घटकांची निर्मितीही कमी होते.
परिणामी, वृद्धत्व लवकर येत नाही. याच युक्तिवादातून असेही म्हणता येते की, कमी खाण्यापेक्षासुद्धा अधूनमधून उपवास करण्याने ही प्रक्रिया कमी होते. म्हणजे उपवास केला की, पोटात अन्न घालण्याचा प्रश्न येत नाही. उष्मांक कमी मिळतात. पचण्याची प्रक्रिया घडत नाही आणि वृद्धत्व लांबणीवर पडते. ( Small Diet Benefit )
Latest Marathi News अल्प आहार लाभदायक Brought to You By : Bharat Live News Media.