नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार! राज्यपालांची वेळ मागितली

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारच्‍या राजकारणाने (Bihar Politics) पुन्‍हा एकदा ‘सत्ताकारणा’तील वर्तुळ पूर्ण केले आहे. जनता दल संयुक्‍तचे (जेडीयू) सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे राष्‍ट्रीय जनता दल (आरजेडी) साथ सोडत पुन्‍हा एकदा भाजपबरोबर सरकार स्‍थापन करणार असल्‍याच्‍या चर्चेला उधाण आले आहे. विरोधी इंडिया आघाडीचे शिल्पकार असलेले नितीश आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा … The post नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार! राज्यपालांची वेळ मागितली appeared first on पुढारी.

नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार! राज्यपालांची वेळ मागितली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बिहारच्‍या राजकारणाने (Bihar Politics) पुन्‍हा एकदा ‘सत्ताकारणा’तील वर्तुळ पूर्ण केले आहे. जनता दल संयुक्‍तचे (जेडीयू) सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे राष्‍ट्रीय जनता दल (आरजेडी) साथ सोडत पुन्‍हा एकदा भाजपबरोबर सरकार स्‍थापन करणार असल्‍याच्‍या चर्चेला उधाण आले आहे. विरोधी इंडिया आघाडीचे शिल्पकार असलेले नितीश आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात आणि भाजपच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन करू शकतात. त्यांनी आज सकाळी राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे.

Bihar Chief Minister Nitish Kumar has sought time to meet the Governor today morning: Sources
— ANI (@ANI) January 28, 2024

‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार, नितीश कुमार (Nitish Kumar) रविवारी सकाळी १० वाजता जेडीयू आमदारांसोबत बैठक घेऊ शकतात. यानंतर ते राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा देऊ शकतात आणि संध्याकाळपर्यंत बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन होऊ शकते. नितीश यांच्यासोबत भाजपचे दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेऊ शकतात. विधानसभा अध्यक्षपदही भाजपच्या कोट्यात येऊ शकते. प्रदेश भाजपचीही बैठक सकाळी ९ वाजता होणार आहे. भाजपने नितीश यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची घोषणा झालेली नाही.
‘हे राजकारण आहे’
नितीश कुमार यांच्या राजीनामा देणार या शक्‍यतेबाबत काँग्रेस आमदार शकील अहमद खान म्‍हणाले की, नितीश कुमार यांना राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी गेले होते. त्यानंतर विजय चौधरी त्यांना बाहेर भेटायला आले आणि नितीश यांनीही चांगला प्रतिसाद दिला. हे राजकारण आहे. इथे काय म्हणता येईल? जेडीयूचे आमदार बिजेंद्र यादव म्हणाले की, ते पक्षाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यांचा पक्ष जो काही निर्णय घेतो, तो स्वीकारतो.
Latest Marathi News नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार! राज्यपालांची वेळ मागितली Brought to You By : Bharat Live News Media.