नारायणगाव येथे अंगणवाडीतील १९ हजार रुपयांचे साहित्य लंपास

पैठण पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील पाचोड नंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवीन बदलून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना चोरट्याने सलामी देण्याचे सत्र सुरूच ठेवले असून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नारायणगाव येथे चोरट्यांनी १९ हजार रुपये किमतीचे अंगणवाडीतील साहित्य मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. अधिक माहिती अशी की नारायणगाव येथील अंगणवाडी क्रं २ ही गेल्या दिड महिन्यापांसून … The post नारायणगाव येथे अंगणवाडीतील १९ हजार रुपयांचे साहित्य लंपास appeared first on पुढारी.

नारायणगाव येथे अंगणवाडीतील १९ हजार रुपयांचे साहित्य लंपास

पैठण Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील पाचोड नंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवीन बदलून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना चोरट्याने सलामी देण्याचे सत्र सुरूच ठेवले असून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नारायणगाव येथे चोरट्यांनी १९ हजार रुपये किमतीचे अंगणवाडीतील साहित्य मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की नारायणगाव येथील अंगणवाडी क्रं २ ही गेल्या दिड महिन्यापांसून संपामुळे बंद होती.अंगणवाडी बंद असल्याची फायदा घेत चोरट्यानी अंगणवाडी मधील १५ हजार रूपयांची एलईडी टिव्ही ,गॅसचे साहित्य,ईन्व्हर्टर ,लहान बालकांची खेळणी साहित्य व तांदूळ ,मुगडाळ असा एकून १९ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचा प्रकार शनिवार दि.२७ रोजी उघडकीस आला.या प्रकरणी फिर्यादी गीता बाठे (अंगणवाडी सेविका)यांच्या फिर्यादिवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून.पुढील तपास सपोनि ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार खंडागळे हे करीत आहे.
Latest Marathi News नारायणगाव येथे अंगणवाडीतील १९ हजार रुपयांचे साहित्य लंपास Brought to You By : Bharat Live News Media.