ओबीसींवर अन्याय नाहीच : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : ओबीसींवर अन्याय होईल, असा कोणताही निर्णय राज्य सरकार घेणार नाही व घेतलेला नाही. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकार सकारात्मकच होते, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांचे यांनी सकारात्मक पद्धतीने आंदोलन केले. चांगला मार्ग यातून निघाला,
ज्यांच्या नोंदी आहेत आणि कायदेशीर अधिकार असताना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांना ते मिळण्याचा मार्ग यातून सरकारने मोकळा केला आहे. त्याची पद्धत सोपी केली आहे. कायद्याचा आणि संविधानाच्या कक्षेतच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल, हे आमचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीपासूनच सांगत आहेत ; तीच भूमिका आजही कायम आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
Latest Marathi News ओबीसींवर अन्याय नाहीच : चंद्रशेखर बावनकुळे Brought to You By : Bharat Live News Media.
