महाडच्या माहेरवाशिनींनी राजहंस गडावर राष्ट्रध्वजासह भगवा फडकविला

महाड, पुढारी वृत्तसेवा: हिंदवी स्वराज्याला ३५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ३७५ किल्ल्यांवर भारताचा तिरंगा आणि भगवा झेंडा फडकाविण्यात आला. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने ही मोहीम प्रजासत्ताक दिनी राबविण्यात आली. बेळगावमधील संस्कृती ग्रुप यांच्यामार्फत महिलांनी राजहंस गडावर तिरंगा तसेच भगवा फडकावला. बेळगावमधील रंगकर्मी तसेच गिर्यारोहक निता कुलकर्णी यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामध्ये … The post महाडच्या माहेरवाशिनींनी राजहंस गडावर राष्ट्रध्वजासह भगवा फडकविला appeared first on पुढारी.

महाडच्या माहेरवाशिनींनी राजहंस गडावर राष्ट्रध्वजासह भगवा फडकविला

महाड, Bharat Live News Media वृत्तसेवा: हिंदवी स्वराज्याला ३५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ३७५ किल्ल्यांवर भारताचा तिरंगा आणि भगवा झेंडा फडकाविण्यात आला. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने ही मोहीम प्रजासत्ताक दिनी राबविण्यात आली.
बेळगावमधील संस्कृती ग्रुप यांच्यामार्फत महिलांनी राजहंस गडावर तिरंगा तसेच भगवा फडकावला. बेळगावमधील रंगकर्मी तसेच गिर्यारोहक निता कुलकर्णी यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामध्ये बेळगावला राहणाऱ्या व ज्यांचे माहेर महाड आहे, अशा पाच महिलांनी सहभाग घेतला. या मोहिमेचे नेतृत्व महाडच्या बीना तलाठी यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये सारिका गावडे, पद्मिनी सोनार, बिना तलाठी आणि ७५ वर्षांच्या माधुरी तलाठी या महाडच्या माहेरवाशिनींसह २० महिलांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिना तलाठी यांनी केले. त्यानंतर राष्ट्रध्वज तसेच भगवा फडकवण्यात आला. विनीत तलाठी यांनी उपस्थितितांसमोर शिवप्रतिज्ञेचे वाचन केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्या नीता कुलकर्णी यांनी ५२ फुटी शिवप्रतिमेचे पूजन करून संबोधित केले. त्यानंतर सर्व महिलांनी पारंपरिक लेझीमचा खेळ केला. रमा भिडे यांनी आभार मानले.
हेही वाचा 

रायगड : महाडमधील गादी कारखान्याला भीषण आग; शेजारचे एक दुकान भस्मस्थानी
Raigad : किल्ले रायगडसह ९ किल्ल्यांवर राष्ट्रध्वजासह भगवा फडकविला
रायगड: पनवेलमध्ये रॅलीत झालेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी

Latest Marathi News महाडच्या माहेरवाशिनींनी राजहंस गडावर राष्ट्रध्वजासह भगवा फडकविला Brought to You By : Bharat Live News Media.