रत्नागिरी : विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

रत्नागिरी : Bharat Live News Media वृत्तसेवा तालुक्यातील नांदिवडे येथे विवाहबाह्य संबंधातून महिलीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पती सुरेश धोंडू पडवळ (वय 64,रा.भंडारवाडा नांदिवडे, रत्नागिरी) यांचा खून केला. ही घटना 26 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी जयगड पोलिसांनी संशयित पत्नी आणि तिचा प्रियकर (दोन्ही रा.भंडारवाडा नांदिवडे, रत्नागिरी) या दोघांना रात्री उशिरा अटक केली.
या दोघांनी कट रचून हत्याराने सुरेश पडवळ यांच्या हाता-पायांवर, छातीवर आणि डोक्यावर मारून त्यांचा खून केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
केरळचे राज्यपाल राज्य सरकारवर भडकले, थेट रस्त्यावरच धरणे आंदोलन
Arvind Kejriwal On BJP: केजरीवालांच्या भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले,’आपच्या आमदाराला २५ कोटी’
न्यायमूर्ती विरुद्ध न्यायमूर्ती : कोलकाता उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?
Latest Marathi News रत्नागिरी : विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या Brought to You By : Bharat Live News Media.
