
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका काव्यांजली- सखी सावली या मालिकेत काव्या आणि अंजली या दोघी बहिणींच्या जोडीला तसेच प्रितम-अंजली या जोडप्याला ही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. मालिकेतील श्रेष्ठा व निकिता यांची कायमच विश्वजीत आणि प्रितमला काव्या व अंजलीपासून दूर करण्याचे कारस्थान चालू असतं. या मालिकेत श्रेष्ठाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिका काशीकरने मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
संबंधित बातम्या –
दादासाहेब फाळके पुरस्कार प्रेस कॉन्फरन्समध्ये अदिती राव हैदरीचा स्टायलिश अंदाज
Animal-Fighter Movie : ओटीटीवर ‘ॲनिमल’ची तर थिएटरमध्ये ‘फायटर’ची अनोखी कमाई!
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट यादिवशी येणार भेटीला
सानिका काशीकरने मालिका सोडली असून आता अभिनेत्री अपूर्वा परांजपे या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. श्रेष्ठाची नकारात्मक भूमिका असली तरी प्रेक्षकांना तितकीच पसंतीची आहे. काव्यांजलीमध्ये नवीन श्रेष्ठाची एंट्री पाहण्यासाठी काव्यांजली-सखी सावली, सोम-शनि, ८.३० वाजता पाहता येणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Apurva G Paranjape 🧿 (@_apurva_paranjape_)
View this post on Instagram
A post shared by Apurva G Paranjape 🧿 (@_apurva_paranjape_)
Latest Marathi News सानिका काशीकरने मालिका सोडली! अपूर्वा परांजपे ‘काव्यांजली’मध्ये Brought to You By : Bharat Live News Media.
