रवींद्र जडेजाची शतकाच्या दिशेने वाटचाल

India vs England 1st Test Day 3 : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा आजचा तिसरा दिवस आहे. इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांवर आटोपल्यानंतर भारताने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाअखेर ७ विकेट गमावत ४२१ धावा केल्या केल्या. भारताने दुसऱ्या दिवसाअखेर १७५ धावांची आघाडी घेतली होती. रवींद्र जडेजाची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तर अक्षर पटेल ३५ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडकडून टॉम हार्टली आणि जो रूटने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या आहेत.
याआधी यशस्वी जैस्वालने ८० धावांची खेळी केली. तर केएल राहुलने कसोटी कारकिर्दीतील १४वे अर्धशतक झळकावले होते. पण तो ८६ धावांवर तो हार्टलीकरवी रेहान अहमदकडे झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी राहुलने रवींद्र जडेजासोबत ६५ धावांची भागीदारी केली. यानंतर जडेजा आणि केएस भरत यांनी जबाबदारी स्वीकारली आणि दोघांनी ६८ धावांची भागीदारी केली. पण जो रूटने केएस भरतला एलबीडब्ल्यू आऊट केले. भरतला ४१ धावा करता आल्या.
Latest Marathi News रवींद्र जडेजाची शतकाच्या दिशेने वाटचाल Brought to You By : Bharat Live News Media.
