कोकण रेल्‍वे मार्गावर धावणार अयोध्या दर्शन ट्रेन

खेडशहर ; पुढारी वृत्तसेवा अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उद्घाटनानंतर आता सगळ्यांनाच अयोध्या दर्शनाची आस लागली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा देशभरातून ओघ सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन देशभरातील ६६ स्थानकांवरून भाविकांना अयोध्या दर्शन घडवण्यासाठी ‘आस्था ट्रेन’ चालवल्या जाणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील ही संधी प्रवाशांना उपलब्ध होणार … The post कोकण रेल्‍वे मार्गावर धावणार अयोध्या दर्शन ट्रेन appeared first on पुढारी.

कोकण रेल्‍वे मार्गावर धावणार अयोध्या दर्शन ट्रेन

खेडशहर ; Bharat Live News Media वृत्तसेवा अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उद्घाटनानंतर आता सगळ्यांनाच अयोध्या दर्शनाची आस लागली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा देशभरातून ओघ सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन देशभरातील ६६ स्थानकांवरून भाविकांना अयोध्या दर्शन घडवण्यासाठी ‘आस्था ट्रेन’ चालवल्या जाणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील ही संधी प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या गाडीसाठी कोकणातील अनेक रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या विशेष गाड्या आयआरसीटीसीमार्फत चालवल्या जाणार आहेत. यानुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी पहिली गाडी गोव्यातील वास्को जंक्शनवरून १२ फेब्रुवारीला सुटणार आहे. अयोध्येत भगवान प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येऊ लागले आहेत. हीच बाब लक्षात घेऊन आयआरसीटीसीमार्फत भाविकांना अयोध्येत घेऊन येण्यासाठी तसेच दर्शनानंतर त्यांना पुन्हा मूळ ठिकाणी पोहोचवण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष गाडी वास्को येथून दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी अयोध्येसाठी निघेल. मजोरडा, मडगाव, करमाळी, थिवी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड ही गोवा तसेच महाराष्ट्रातील स्थानके घेत उत्तर प्रदेशातील अयोध्येकडे रवाना होईल.
हेही वाचा : 

मनाेज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य; वाशीत मराठा आंदोलकांचा जल्‍लोष 
Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा तिढा मिटला; सगे सोयऱ्यांनाही मिळणार कुणबी दाखले

दिल्लीत इमारतीला भीषण आग; ९ महिन्यांच्या बाळासह चौघांचा मृत्यू

Latest Marathi News कोकण रेल्‍वे मार्गावर धावणार अयोध्या दर्शन ट्रेन Brought to You By : Bharat Live News Media.