तमाशा पाहून घरी परतत असताना भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे येथील दोघे पिलखोड येथे तमाशा पाहण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना झालेल्या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे येथील समाधान रावण पाटील (24) आणि कैलास धनराज पाटील (40) हे पिलखोड येथे दुचाकीने तमाशा पाहण्यासाठी गेले होते. तमाशा पाहून घरी परत येत असताना गुरूवार (दि. … The post तमाशा पाहून घरी परतत असताना भीषण अपघात, दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

तमाशा पाहून घरी परतत असताना भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे येथील दोघे पिलखोड येथे तमाशा पाहण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना झालेल्या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे येथील समाधान रावण पाटील (24) आणि कैलास धनराज पाटील (40) हे पिलखोड येथे दुचाकीने तमाशा पाहण्यासाठी गेले होते. तमाशा पाहून घरी परत येत असताना गुरूवार (दि. 25) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास साकुर फाटा येथे रस्त्यावर उसाने भरलेल्या उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी जोरदार आदळली. दुचाकीवरील कैलास पाटील आणि धनराज पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परीसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून मदत केली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. दरम्यान, कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. समाधान पाटील याच्या पश्चात मूलगा, पत्नी, आई, वडील असून तो एकुलता एक होता. तर कैलास पाटील यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा :

Hemophilia : करा हिमोफिलियाचा मुकाबला
नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालक साठे, कोठारी ताब्यात
Manoj Jarange Patil- Maratha Reservation | ब्रेकिंग! अध्यादेश निघेपर्यंत माघार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

Latest Marathi News तमाशा पाहून घरी परतत असताना भीषण अपघात, दोघांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.