जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य; आदोलकांचा जल्लोष

मुंबई ; Bharat Live News Media ऑनलाईन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपला. रात्री उशिरा सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या. सरकारच्या अध्यादेशानंतर मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा समाजाकडून जल्लोष केला जात आहे. मोठ्या संघर्षानंतर जरांगेंच्या स्वागतासाठी जेसीबी आणण्यात आले असून, यातून फुलांची उधळण होणार आहे. या ठिकाणच्या एपीएमसी मार्केटमध्येच मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे काल त्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती सर्व मराठा समाजासमोर मांडणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री स्वत:हा उपोषणस्थळी येउन जरांगेंचे उपोषण सोडवणार आहेत.
दरम्यान सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या माण्य केल्याने एपीएमसी मार्केटच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. अण्णासाहेब पाटील यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी भूमीका काही आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला.
#WATCH | Navi Mumbai: Maratha reservation activists celebrate after Manoj Jarange Patil announces to end the protests today as the government has accepted their demands pic.twitter.com/V1KxosEHRm
— ANI (@ANI) January 27, 2024
Latest Marathi News जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य; आदोलकांचा जल्लोष Brought to You By : Bharat Live News Media.
