नगर : राहुरी येथील वकील दाम्पत्यांचा निर्घृण खून

राहुरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : राहुरी न्यायालयामध्ये वकील व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदत करणार्या आढाव दाम्पत्यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या दोघा पती – पत्नीचा मृतदेह उंबरे (ता.राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहीरीत आढळला. अॅड. राजाराम जयवंत आढाव (५२) व अॅड. मनिषा आढाव असे या दाम्पत्याचे नाव आहे. सायंकाळी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. दोघांनाही दगड बांधून विहीरीत टाकून दिल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा :
रायगड : महाडमधील गादी कारखान्याला भीषण आग; शेजारचे एक दुकान भस्मस्थानी
पुणे : आळंदीत अल्पवयीन तीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
कोल्हापूर: वाठारजवळ दुचाकी अपघातात ऊसतोड मजूर ठार
Latest Marathi News नगर : राहुरी येथील वकील दाम्पत्यांचा निर्घृण खून Brought to You By : Bharat Live News Media.
