नागपूर: केरळच्या प्रवाशाकडून विमानतळावर ३४ लाखांचे सोने जप्त

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आखाती देशांमधून पेस्टच्या स्वरूपात सोने तस्करी गेल्या काही महिन्यात वाढली असून डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एक घटना उघडकीस आली. यावेळी प्रथमच केरळच्या एका प्रवाशाकडून  34 लाख रुपयांचे अर्धा किलो सोने घेऊन येताच सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले. या सोने तस्करी प्रकरणी सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त पीयूष … The post नागपूर: केरळच्या प्रवाशाकडून विमानतळावर ३४ लाखांचे सोने जप्त appeared first on पुढारी.

नागपूर: केरळच्या प्रवाशाकडून विमानतळावर ३४ लाखांचे सोने जप्त

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : आखाती देशांमधून पेस्टच्या स्वरूपात सोने तस्करी गेल्या काही महिन्यात वाढली असून डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एक घटना उघडकीस आली. यावेळी प्रथमच केरळच्या एका प्रवाशाकडून  34 लाख रुपयांचे अर्धा किलो सोने घेऊन येताच सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले.
या सोने तस्करी प्रकरणी सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर कस्टम्स युनिटच्या कस्टम अधिकाऱ्यांच्या दक्षता पथकाने ही कारवाई केली.
सहाय्यक आयुक्त व्ही. सुरेश बाबू, अंजुम तडवी यांनी गुन्हा दाखल केला. भारतीय पासपोर्ट धारक केरळचा रहिवासी असलेला हा तरुण शारजाहून नागपूरला कतार एअरवेजच्या फ्लाइट  QR-590 ने दाखल झाला. त्याने पेस्ट स्वरूपात अंतर्वस्त्रातून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. नागपूर विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पद हालचालीवरून ताब्यात घेत 549 ग्रॅम सोने जप्त केले.
हेही वाचा 

नागपूर: फडणवीस यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल प्रदान  
Republic Day 2024 : वैदर्भीय कलावंताचा ‘माता जिजाऊ, शिवरायां’चा चित्ररथ ठरला लक्षवेधी
Devendra Fadnavis : आंदोलनाचा सर्वांना अधिकार पण… ; फडणवीसांचा जरांगेंना सबुरीचा सल्ला

Latest Marathi News नागपूर: केरळच्या प्रवाशाकडून विमानतळावर ३४ लाखांचे सोने जप्त Brought to You By : Bharat Live News Media.