पहिली शिक्षण असलेल्या कर्मचाऱ्याला सर्वेसाठी पाठवले ; व्हीडियो व्हायरल

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशाप्रमाणे महापालिका हद्दीत मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू आहे. मनपाने बिगारी, शिवाई, सफाई असा अल्पशिक्षित कर्मचार्यांना सर्वेक्षणासाठी नेमले आहे. त्यात एका कर्मचार्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महापालिका प्रशासनाची धांदल उडाली. उपायुक्त श्रीनिवास कुर्हे यांनी सारवासारव करीत आस्थापना विभागाकडून माहिती घेऊन अल्पशिक्षित कर्मचार्यांना तत्काळ सर्वेक्षणातून वगळण्यात येईल, तेथे नवीन कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे सांगितले.
महापालिका हद्दीत मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिका कर्मचारी व खासगी शिक्षक असे 901 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात महापालिकेचे सुमारे तीनशे कर्मचारी आहेत. त्यात शिपाई, बिगारी, सफाई कामगारांचा समावेश आहे. त्यांना इंग्रजीचे ज्ञान नाही. अँड्रॉईड मोबाईलही वापरता येत नाही, अशा कर्मचार्यांकडून सर्वेक्षण होणार नाही. त्यांची सर्वेक्षणासाठी नियुक्ती करून नये, अशी मागणी मनपा कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली होती. काही कर्मचार्यांनी मदतीसाठी नातू, सुना, मुलगा यांना बोलावून घेतल्याचे सांगितले.
दरम्यान, आज सकाळी महापालिकेच्या इलेक्ट्रिक मदतनीस असलेल्या कर्मचार्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पहिली शिक्षण असूनही मला सर्वेक्षणाला पाठविल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची धांदल उडाली. त्यांनी संबंधित कर्मचार्यांना बोलावून अडचणी असतील तर पर्यवेक्षक, वरिष्ठ अधिकार्यांना सांगायचे. नागरिकांना कशाला सांगितले, अशी समज दिली. तसेच, आस्थापना विभागप्रमुख मेहेर लहारे यांच्याकडून अशिक्षित कर्मचार्यांना अहवाल मागवून नवीन कर्मचारी नेमण्याच्या सूचनाही दिल्या.
244 शिक्षकांची सर्वेक्षणाला नकारघंटा
राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार महापालिका हद्दीत मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यात सुमारे 508 शिक्षकांचा समावेश आहे. सर्व शिक्षण नगर शहरातील खासगी शाळेवर नियुक्त आहेत. त्यात सुमारे 244 शिक्षकांनी विविध अडचणी सांगून आम्हाला सर्वेक्षणाचे काम नको म्हणून महापालिकेच्या आस्थापना विभागप्रमुखांकडे अर्ज केला आहे. शिक्षक सर्वेक्षण करणार नाहीत. मग बिनचूक सर्वेक्षण कोण करणार असा सवाल मराठा बांधवांमधून उपस्थित केला जात आहे.
सर्वेक्षणासाठी अंगठा बहाद्दर
महापालिका अधिकार्यांनी एका शाळेत न गेलेल्या कर्मचार्यांची केडगाव परिसरात सर्वेक्षणासाठी नियुक्ती केली आहे. तो अंगठा बहाद्दर कर्मचारी कसे सर्वेक्षण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अॅपच्या नावाने बोंबाबोंब
23 जानेवारीपासून महापालिका हद्दीत मराठा सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यात अनेकांना अद्याप अॅप डाऊनलोड झालेले नाही. डाऊनलोड झाले, त्यांना एरर येत आहे. सुमारे 183 प्रश्न असल्याने काय माहिती भरायची याचाही गोंधळ होत आहे.
कर्मचारी इलेक्ट्रिक मदतनीस मनोज कांबळे यांना अधिकार्यांनी बोलावून दमबाजी केली. परंतु, कर्मचारी संघटना कांबळे यांच्या पाठीशी आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन करू. शिपाई, बिगारी, सफाई कर्मचार्यांना मराठा सर्वेक्षणाचे काम देऊन महापालिका अधिकार्यांनी 2004 च्या आरक्षण कायद्याचा भंग केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्य मागासवर्ग आयोगाकडे तक्रार करून अधिकार्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी करणार आहे.
– अनंत लोखंडे, अध्यक्ष, मनपा कामगार युनियन
Latest Marathi News पहिली शिक्षण असलेल्या कर्मचाऱ्याला सर्वेसाठी पाठवले ; व्हीडियो व्हायरल Brought to You By : Bharat Live News Media.
