कोल्हापूर: वाठारजवळ दुचाकी अपघातात ऊसतोड मजूर ठार

किणी, पुढारी वृत्तसेवा : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तात्या वामन चव्हाण (वय २६, रा. अकलूज, सध्या रा. तळसंदे) हा ऊसतोडणी मजूर जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी (दि.२५) रात्री साडेदहाच्या सुमारास वाठार – वारणानागर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, तात्या चव्हाण हा वारणा कारखान्याकडील मुकादमाकडे ऊसतोडणी मजूर म्हणून काम … The post कोल्हापूर: वाठारजवळ दुचाकी अपघातात ऊसतोड मजूर ठार appeared first on पुढारी.

कोल्हापूर: वाठारजवळ दुचाकी अपघातात ऊसतोड मजूर ठार

किणी, Bharat Live News Media वृत्तसेवा : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तात्या वामन चव्हाण (वय २६, रा. अकलूज, सध्या रा. तळसंदे) हा ऊसतोडणी मजूर जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी (दि.२५) रात्री साडेदहाच्या सुमारास वाठार – वारणानागर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तात्या चव्हाण हा वारणा कारखान्याकडील मुकादमाकडे ऊसतोडणी मजूर म्हणून काम करत होता. दिवसभर ऊस तोडणी केल्यानंतर सायंकाळी तो दुरुस्तीला टाकलेला मोबाईल आणण्यासाठी वडगाव येथे गेला होता. वडगावहुन तळसंदेकडे परतत असताना वाठारच्या पुढे काही अंतर आला असता अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
तात्या चव्हाण रस्त्यावर जोरात आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने नेमका अपघात कसा घडला, हे कळू शकले नाही. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. तात्या चव्हाण हा मूळ अकलूज येथील राहणारा असून त्याच्या मागे पत्नी व लहान मुल असा परिवार आहे. अपघातानंतर नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
हेही वाचा 

कोल्हापूर : हालोंडी येथे ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव
कोल्हापूर : मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचा अंत! पुत्रवियोगामुळे पित्याचीही प्रकृती अत्यवस्थ
कोल्हापूर : रुईकर कॉलनीत साडेतीन लाखांचे दागिने चोरणार्‍या तिघांना अटक

Latest Marathi News कोल्हापूर: वाठारजवळ दुचाकी अपघातात ऊसतोड मजूर ठार Brought to You By : Bharat Live News Media.