लातूर : मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ देवणी परिसरात कडकडीत बंद

वलांडी, Bharat Live News Media वृत्तसेवा : देवणी तालुक्यात वलांडीत एका सहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ परिसरातील अनेक गावांतील व्यापाऱ्यांनी आज (दि. २६) उत्स्फूर्त बंद पाळून दोषीवर कडक कारवाईची मागणी केली.
देवणी, अचवला, दवणहिप्परगा, बोबळी, टाकळी, धनेगाव , रामवाडी, कवठाळ, कोरेवाडी आदी गावातील नागरिकांनी आक्रमक आंदोलन केले. व तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.
या प्रकरणी देवणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका सहा वर्षीय मुलगी घरासमोर खेळत होती. यावेळी एका युवकाने शॅम्पूची पुडी घेऊन ये म्हणून तिला बोलाविले. आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी रडत आसल्याने तिच्या आईने सखोल चौकशी केल्यानंर तिला मुलीने याबाबत सांगितले. या प्रकरणी देवणी पोलिसांत पोक्सो व अॕट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा
लातूर : रावणकोळा येथील दोन चुलत भावांच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना अटक
लातूर : रावणकोळा येथे दोघांचा खून; जळकोट तालुका हादरला
लातूर : मराठा आरक्षणासाठी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवले
Latest Marathi News लातूर : मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ देवणी परिसरात कडकडीत बंद Brought to You By : Bharat Live News Media.
