Crime News : गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरुन मारहाण

राहुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : राहुरी परिसर येथे चारचाकी वाहनातून जात असलेल्या व्यक्तीने रस्त्यावर असलेली गाडी बाजुला घ्या असे सांगितल्याचा राग आल्याने तीघांनी एकास लाठी व हाताने बेदम मारहाण करीत गळ्यातील 1 लाख रुपयांची सोन्याची चैन चोरल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार निलेश जनार्दन भोसले(34)रा. कोनार्क नगर, हॉटेल जत्रा शेजारी नाशिक यांनी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 24 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजता ते आपले खाजगी काम आटोपून किया कंपनीची सेल्टॉस चारचाकी वाहन क्र. एमएच 20 एफ यु 8390 यातून नगर येथून राहुरीमार्गे नाशिकला जात होते.
राहुरी शहराच्या पुढे गेल्यानंतर हॉटेल व्हिलेज समोर स्विफ्ट चारचाकी क्र. एम एच 42 एच 1874 रस्त्यावर उभी होती. गाडी बाजुला घ्या असे म्हणाल्याचा राग आल्याने त्या गाडीतून एक जण आला व त्याने मला गाडी साईडला घेण्यास सांगत खाली उतरवले. त्याचवेळी तीघांनी भोसले यांना चैतन्य मिल्क व अॅक्वा फर्मवरील इसमाने काठी घेऊन येत मारहाण सुरू केली. यावेळी तीघांनी बेदम मारहाण केली.
तक्रारदार भोसले हे पोलिस ठाण्यात आले असता आरोपीही पाठीमागून आले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी ज्ञानेश्वर दत्तात्रय गाडे रा. बारागाव नांदूर ता. राहुरी , प्रशांत शिवाजी पुजारी रा. श्रीरामपूर, किशोर कोंडाजी मोरे रा. टाकळीमिया ता. राहुरी यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत आरोपी गाडे याने भोसले यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन ओढून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
Latest Marathi News Crime News : गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरुन मारहाण Brought to You By : Bharat Live News Media.
