अजित पवार मुख्यमंत्री व्हावे : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदार संघात विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला. यामुळे कोपरगाव मतदार संघात झालेला विकास अजित पवार यांच्यामुळे झाला. भविष्यात मतदार संघाचा अधिक विकास साध्य करण्यासाठी विकासाला मदत करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केली. … The post अजित पवार मुख्यमंत्री व्हावे : आ. आशुतोष काळे appeared first on पुढारी.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदार संघात विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला. यामुळे कोपरगाव मतदार संघात झालेला विकास अजित पवार यांच्यामुळे झाला. भविष्यात मतदार संघाचा अधिक विकास साध्य करण्यासाठी विकासाला मदत करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केली. अ.नगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा (शिर्डी लोकसभा) युवक मेळावा राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ. काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगावात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
भारताकडे तरुणांचा देश म्हणून पहिले जाते. जगात सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आपल्या देशात आहे. युवकांना योग्य व्यासपीठ देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले. आजचा युवक या देशाचे उद्याचे भविष्य असल्याने त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे, असे मत आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. कोपरगाव मतदार संघात रस्ते, आरोग्य, पाणी योजना, एम.आय.डी.सी. आदी प्रश्न पवारांमुळेच सुटले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे, असे आ. काळे म्हणाले.
कमळ सोडले अन् हाती बांधले घड्याळ!
राष्ट्रवादी युवक मेळाव्याप्रसंगी कोपरगावातील खडकी भागातील राहुल शिरसाट, रविंद्र पवार, छोटू बैरागी, समीर शेख, अजय लोखंडे, पप्पू खरात, सोनू सुराशे, सुनील मोकळ, रोहित काकुळदे, निलेश गुजर, अनुप विलास आढाव, दिनेश गाडेकर, पुणतांबा येथील गौरव जाधव, राहुल पर्‍हे, अमर पर्‍हे, ऋषीकेश सोनवणे, ऋषिकेश सोमवंशी, कुणाल हासे, प्रतिक कबाडे, स्वप्नील कोते, अक्षय सोमवंशी, वाकडी येथील सचिन लहारे, वाल्मिक लहारे, अक्षय लहारे, स्वप्नील कोते, अण्णासाहेब कोते, सचिन शेळके या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘कमळा’ची साथ सोडून प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन, ‘घड्याळा’चा स्वीकार केला.
Latest Marathi News अजित पवार मुख्यमंत्री व्हावे : आ. आशुतोष काळे Brought to You By : Bharat Live News Media.