प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री बेशुद्ध

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साह साजरा होत आहे. दरम्यान तेलंगणा राज्यात देखील प्रजासत्ताक साजरा करण्यात आला. दरम्यान हैद्राबाद येथील तेलंगणा भवनात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम सुरू होता. याचवेळी तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री महम्मूद अली हे अचानक बेशुद्ध पडले. यानंतर उपस्थित लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे. (Telangana Former Deputy CM)
तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री महम्मूद अली हे के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचे नेते आहेत. ते 2014 ते 2018 पर्यंत तेलंगणाचे उपमुख्यमंत्री होते. केसीआरच्या दुसऱ्या कार्यकाळात महम्मूद अली यांना राज्याचे गृह मंत्रालय, तुरुंग आणि अग्निशमन सेवा ही खाती देण्यात आली होती.
#WATCH | Hyderabad: Former Telangana Deputy CM Mahmood Ali faints during #RepublicDay2024 celebrations at Telangana Bhawan. pic.twitter.com/GCzoMb9l8U
— ANI (@ANI) January 26, 2024
तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री महम्मूद यांचे वादांशी जुने संबंध
महम्मूद अली यांचा वादांशीही दीर्घकाळ संबंध होता. तेलंगणाचे गृहमंत्री असताना त्यांनी महिलांबाबत वक्तव्य केले होते. यावरून बराच वाद झाला होता. महम्मूद म्हणाले होते की, लहान कपडे परिधान केल्याने महिलांना त्रास होऊ शकतो. 2023 मध्ये, जेव्हा महमूद अली पशुसंवर्धन मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंचावर पोहोचले तेव्हा त्यांनी वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्याला चापट मारली कारण त्यांच्या हातात पुष्पगुच्छ नव्हता.
हेही वाचा:
Bihar Political Crisis | नितीशकुमारांचा पुन्हा ‘यू टर्न’! भाजपसोबत रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदी शपथ?
Manoj Jarange Patil- Maratha Reservation | ब्रेकिंग! मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा, दुपारी २ वाजता भूमिका जाहीर करणार
NASAच्या ‘इंजेन्युईटी हेलिकॉप्टर’ मोहिमेला धक्का! मंगळावर लँडिंगवेळी आदळले
The post प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री बेशुद्ध appeared first on Bharat Live News Media.
