Pimpari : तीन दिवसांत 40 हजार कुटुंबांचा सर्व्हे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा समाजाचे गेल्या तीन दिवसांत तब्बल 40 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तिसर्‍या दिवशीही सर्वेक्षणात सर्व्हर डाऊन व लॉगीन संदर्भातील तांत्रिक अडचणी कायम होत्या. मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने राज्यभरात मंगळवारपासून (दि.23) सर्वेक्षण सुरू केले आहे. पहिल्या दिवशी सर्व्हर डाऊन … The post Pimpari : तीन दिवसांत 40 हजार कुटुंबांचा सर्व्हे appeared first on पुढारी.

Pimpari : तीन दिवसांत 40 हजार कुटुंबांचा सर्व्हे

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा समाजाचे गेल्या तीन दिवसांत तब्बल 40 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तिसर्‍या दिवशीही सर्वेक्षणात सर्व्हर डाऊन व लॉगीन संदर्भातील तांत्रिक अडचणी कायम होत्या. मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने राज्यभरात मंगळवारपासून (दि.23) सर्वेक्षण सुरू केले आहे. पहिल्या दिवशी सर्व्हर डाऊन व लॉगीनच्या अडचणी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांना सर्वेक्षणास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि.24) या अडचणीवर मात करीत एकूण 21 हजार 407 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. गुरूवारी (दि.25) तितक्याच संख्येने सर्वेक्षण झाले. आतापर्यंत तीन दिवसांत 40 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या बुधवारपर्यंत (दि.31) शहरातील साडेसहा लाखांपेक्षा अधिक घरांपर्यंत पोहचून सर्वेक्षण करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, 130 कर्मचारी गैरहजर असल्याने त्यांना महापालिकेने नोटीस बजावली होती. त्यापैकी काही कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत.
झोपडपट्टी भागात विरोध
शहरातील काही भागात सर्वेक्षणास विरोध होत आहे. काही झोपडपट्टीत सर्वेक्षण करण्यास महापालिका कर्मचार्‍यांना विरोध करण्यात आला. मागासवर्गीय लोकांचे सर्वेक्षण न करता केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण करा, असे सांगत कर्मचार्‍यांना वस्तीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्या भागांतील मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
Latest Marathi News Pimpari : तीन दिवसांत 40 हजार कुटुंबांचा सर्व्हे Brought to You By : Bharat Live News Media.