रत्‍नागिरी : गावखडी समुद्रकिनारी ३७ लाखाचे चरस जप्त

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी सुरूच्या बनात तब्बल 37 लाखांचा 9 किलो चरस हा अंमली पदार्थ बेवारस स्थितीत मिळून आला. ही घटना बुधवार 24 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वा. उघडकीस आली. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे यांनी अज्ञाता विरोधात तक्रार दिली आहे. बुधवारी सायंकाळी गावखडी समुद्रकिनारी तेथील नागरिकांना अंमली पदार्थ सदृश्य पदार्थ … The post रत्‍नागिरी : गावखडी समुद्रकिनारी ३७ लाखाचे चरस जप्त appeared first on पुढारी.

रत्‍नागिरी : गावखडी समुद्रकिनारी ३७ लाखाचे चरस जप्त

रत्नागिरी : Bharat Live News Media वृत्तसेवा तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी सुरूच्या बनात तब्बल 37 लाखांचा 9 किलो चरस हा अंमली पदार्थ बेवारस स्थितीत मिळून आला. ही घटना बुधवार 24 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वा. उघडकीस आली. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे यांनी अज्ञाता विरोधात तक्रार दिली आहे.
बुधवारी सायंकाळी गावखडी समुद्रकिनारी तेथील नागरिकांना अंमली पदार्थ सदृश्य पदार्थ दिसून आला. त्यांनी तातडीने याची माहिती पूर्णगड पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या पदार्थाची तपासणी केली असता, त्यांना 9 किलो 216 ग्रॅम वजनाचा चरस (हशिश) हा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. हा अंमली पदार्थ विक्रीसाठी अज्ञाताने या ठिकाणी आणला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या प्रकरणी अज्ञाता विरोधात पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.
हेही वाचा : 

Manoj Jarange Patil- Maratha Reservation | ब्रेकिंग! मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा, दुपारी २ वाजता भूमिका जाहीर करणार  
Republic Day 2024 Updates | भूदल, नौदल अन् वायू दलातील ‘अग्निवीर’ महिला पथक पहिल्यांदाच कर्तव्यपथावर

NASAच्या ‘इंजेन्युईटी हेलिकॉप्टर’ मोहिमेला धक्का! मंगळावर लँडिंगवेळी आदळले

Latest Marathi News रत्‍नागिरी : गावखडी समुद्रकिनारी ३७ लाखाचे चरस जप्त Brought to You By : Bharat Live News Media.