दुर्दैवी ! बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांचा मुलगा ठार

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गत आठवड्यात लोणीतील 9 वर्षाच्या अथर्वचा बळी घेतल्यानंतर आता लोणीपासून जवळच असलेल्या सादतपूरमध्ये बिबट्याने पाच वर्षीय मुलाचा बळी घेतला. गुरूवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सादतपूर (ता. संगमनेर) गावात भरदिवसा ही घटना घडली. हर्षल राहुल गोरे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत मुलाचे नाव आहे. तो माजी उपसरपंच प्रकाश गोरे यांचा पुतण्या आहे. … The post दुर्दैवी ! बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांचा मुलगा ठार appeared first on पुढारी.

दुर्दैवी ! बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांचा मुलगा ठार

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  गत आठवड्यात लोणीतील 9 वर्षाच्या अथर्वचा बळी घेतल्यानंतर आता लोणीपासून जवळच असलेल्या सादतपूरमध्ये बिबट्याने पाच वर्षीय मुलाचा बळी घेतला. गुरूवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सादतपूर (ता. संगमनेर) गावात भरदिवसा ही घटना घडली. हर्षल राहुल गोरे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत मुलाचे नाव आहे. तो माजी उपसरपंच प्रकाश गोरे यांचा पुतण्या आहे. सादतपूर येथे वस्ती करून गोरे कुटुंब राहते. हर्षल हा भावासोबत राहात्या घरून चुलत्याच्या घरी जात होता. रस्त्याकडेला गिनी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षलवर अचानक हल्ला चढविला. हर्षलला जबड्यात पकडून ओढत गवतात नेले. ही बाब सोबतच्या भावाने पाहताच तो ओरडत घराकडे पळाला. त्यानंतर गोरे कुटुंब ओरडत हर्षलला बिबट्याने उचलून नेलेल्या गवताकडे पळाले. त्यांचा आरडाओरडा ऐकून व जमाव पाहून बिबट्याने तेथून धूम ठोकली. जखमी हर्षल यास कुुटुंबाने तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दोन दिवसांपूर्वीच अकोले शहरात बिबट्याचे दर्शन घडल्याने खळबळ उडाली. अथक परिश्रमानंतर वनविभागाने अकोलेतील बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर आता पुन्हा लोणीत बिबट्याने बळी घेतला.
दहा दिवसांत दुसरा बळी
बिबट्याने लोणीतील अथर्व प्रवीण लहामगे (वय 9) या मुलाचा बळी 15 जानेवारीला घेतला होता. त्यानंतर वनविभागाने ड्रोन कॅमेरेच्या मदतीने बिबट्याचा शोध मोहीम सुरू केली. बिबट्या जेरबंद करण्यासाठी ठिकठिकाणी जवळपास 15 पिंजरे लावले. पाथरी रोडवर एक बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाला. मात्र त्यानंतरही बिबट्याने लोणीपासून जवळच असलेल्या सादतपूरमध्ये लहानग्याचा बळी घेतला.
श्रीगोंदा ते लोणी तीन बळी!
15 जानेवारीला लोणीतील नऊ वर्षीय अथर्व लहामगे श्रीगोंद्याच्या अजनूजमध्ये 19 जानेवारीला उसतोड मजुराची तीन वर्षाची मुलगी लक्ष्मीचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. आज सादतपूरमधील हर्षलचा बळी बिबट्याने घेतला. दहा दिवसांत बिबट्याने तिघा चिमुकल्यांचा जीव घेतला.
Latest Marathi News दुर्दैवी ! बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांचा मुलगा ठार Brought to You By : Bharat Live News Media.