Pune : अजित पवारांच्या ताफ्यास दाखवले काळे झेंडे

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा :  आळेफाटा (ता.जुन्नर) येथे चिल्हेवाडी बंदिस्त जलवाहिनी उर्वरित कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सूरज वाजगे यांचेसह सुधीर घोलप, अनिल गावडे, योगेश तोडकर, … The post Pune : अजित पवारांच्या ताफ्यास दाखवले काळे झेंडे appeared first on पुढारी.

Pune : अजित पवारांच्या ताफ्यास दाखवले काळे झेंडे

आळेफाटा : Bharat Live News Media वृत्तसेवा :  आळेफाटा (ता.जुन्नर) येथे चिल्हेवाडी बंदिस्त जलवाहिनी उर्वरित कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सूरज वाजगे यांचेसह सुधीर घोलप, अनिल गावडे, योगेश तोडकर, राजेश भोर, इंद्रभान गायकवाड या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे मुंबईकडे निघाले असून, मराठा समाज यामध्ये मोठ्या संख्येत सहभाग झाले आहेत. 26 तारखेला ते मराठा समाजासोबत मुंबईत पोहोचणार आहेत.
गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आळेफाटा येथे चिल्हेवाडी बंदिस्त जलवाहिनी उर्वरित कामाचे व बेल्हा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी आले असताना आळेफाटा चौकातून कार्यक्रमस्थळी जाताना त्यांच्या ताफ्यास मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांची धावपळ उडाली त्यांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन आळेफाटा पोलिस ठाण्यात आणले. विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी आमदार शरद सोनवणे ही पोलिस ठाण्यात आले व ते ही ठाण मांडून बसल्याने कार्यकर्तेही पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसले आहेत. ताब्यात घेतलेल्या मराठा आंदोलकांना सोडण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी सांगितले.
हेही वाचा :

दीडशे रुपये कमावले अन् साडेसतरा लाख गमावले ! 
Golden Ram Temple : राम मंदिराची सर्वात सूक्ष्म सुवर्ण प्रतिकृती

Latest Marathi News Pune : अजित पवारांच्या ताफ्यास दाखवले काळे झेंडे Brought to You By : Bharat Live News Media.