‘महापॉवर-पे ’द्वारे सुमारे 218 कोटींचा वीजबिल भरणा

पुणे : पुढ़ारी वृत्तसेवा :  निमशहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना वीजबिल भरणे सोयीचे व्हावे तसेच लहान व्यावसायिकांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणार्‍या महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ या पेमेंट वॉलेटमधून पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 25 लाख 54 हजार 294 वीजग्राहकांनी 217 कोटी 46 लाख रुपयांचा भरणा केला आहे. आतापर्यंत 453 जणांनी ‘महापॉवर-पे’ वॉलेटच्या माध्यमातून … The post ‘महापॉवर-पे ’द्वारे सुमारे 218 कोटींचा वीजबिल भरणा appeared first on पुढारी.

‘महापॉवर-पे ’द्वारे सुमारे 218 कोटींचा वीजबिल भरणा

पुणे : पुढ़ारी वृत्तसेवा :  निमशहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना वीजबिल भरणे सोयीचे व्हावे तसेच लहान व्यावसायिकांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणार्‍या महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ या पेमेंट वॉलेटमधून पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 25 लाख 54 हजार 294 वीजग्राहकांनी 217 कोटी 46 लाख रुपयांचा भरणा केला आहे. आतापर्यंत 453 जणांनी ‘महापॉवर-पे’ वॉलेटच्या माध्यमातून वीजबिल भरणा केंद्र सुरु केले असून, गेल्या वर्षात या वॉलेटधारकांना कमिशन म्हणून तब्बल 1 कोटी 27 लाख 71 हजार 470 रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. ग्राहकांना वीजबिलांचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावा यासाठी महावितरणने स्वतःचे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे.
वयाच्या 18 वर्षावरील कोणीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणार्‍या संस्था वॉलेटधारक होऊ शकतो, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्रभारी ) अंकुश नाळे यांनी केले आहे. पुणे प्रादेशिक विभागात गेल्या वर्षात पुणे जिल्ह्यामध्ये 1 लाख 32 हजार 741 ग्राहकांनी वॉलेटच्या माध्यमातून 12 कोटी 39 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला. यात संबंधित 72 वॉलेटधारकांना कमिशन म्हणून 6 लाख 63 हजार 705 रुपयांचे कमिशन देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात 10 लाख 95 हजार 229 ग्राहकांनी वॉलेटद्वारे 92 कोटी 84 लाख रुपये वीजबिल भरले. यात संबंधित 182 वॉलेटधारकांना 54 लाख 76 हजार 145 रुपयांचे कमिशन देण्यात आले.
Latest Marathi News ‘महापॉवर-पे ’द्वारे सुमारे 218 कोटींचा वीजबिल भरणा Brought to You By : Bharat Live News Media.