भारताची धावसंख्या दोन बाद 150 धावा पार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या हैदराबाद कसोटीचा दुसरा दिवस सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने पहिल्या डावात 246 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना गुरुवारी दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एका विकेटवर 119 धावा केल्या . आज डावाची सुरूवात गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी केली. (IND vs ENG Test 2nd Day)
कसोटी सामन्यात मर्यादित षटकांच्या सामन्याप्रमाणे आक्रमक खेळ करून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करायचे या इंग्लंड संघाच्या बेझबॉल तंत्राचा भारतात पार धुव्वा उडाला. इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली खरी; परंतु भारतीय फिरकीने त्यांचे बेझबॉल तंत्र पुरते गुंडाळून टाकले. इंग्लंडचा पहिला डाव 64.3 षटकांत 246 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात 23 षटकांत एक विकेट गमावून 119 धावा केल्या आहेत. (IND vs ENG Test 2nd Day)
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात रूटचा झटका
दुसऱ्या दिवसाचे पहिले षटक टाकण्यासाठी जो रूट आला. दुसऱ्या दिवसाचे पहिले षटक टाकण्यासाठी जो रूट गोलंदाजीला आला. त्याने आणि पहिल्याच षटकात विकेट घेतली. रुटने यशस्वीला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. तो 74 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 80 धावा करून बाद झाला.
पहिल्या दिवसाचा खेळ
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर जॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी चार षटकांत 25 धावा केल्या. या दोघांचे आक्रमक रूप पाहून भारताचा कर्णधार रोहित शर्माने वेगवान मारा थांबवून फिरकी गोलंदाजांना पाचारण केले. ही युक्ती यशवी ठरली आणि इंग्लंडला पहिला धक्का 12 व्या षटकात 55 धावांवर बसला.
अश्विनने बेन डकेटला यष्टिचीत केले. डकेटने 35 धावा केल्या. त्यानंतर फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ऑली पोपने (1) रोहितकडे झेल दिला. पुढील षटकांत अश्विनच्या गोलंदाजीवर क्राऊलीचा सिराजचे अप्रतिम झेल घेतला. क्राऊलीने 20 धावा केल्या.
जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडचा डाव सावरत लंचनंतर 50 धावांची भागीदारीही केली. मात्र, अक्षरच्या फिरकीवर बेअरस्टो त्रिफळाचीत झाला. 121 धावांवर इंग्लंडला चौथा धक्का बसला. बेअरस्टोने 58 चेंडूंत 37 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने जो रूटला बाद करून इंग्लंडला पाचवा धक्का दिला. त्याने 60 चेंडूंत 29 धावा केल्या. यानंतर इंग्लंडला 137 धावांवर सहावा धक्का बसला. अक्षर पटेलने बेन फॉक्सला यष्टिरक्षक के.एस. भरतकरवी झेलबाद केले. त्याने केवळ चार धावांचे योगदान दिले. इंग्लंडला 155 धावांवर सातवा धक्का बसला. जसप्रीत बुमराहनेही रेहान अहमदला यष्टिरक्षक के.एस. भरतकडे झेलबाद करून खाते उघडले. जडेजाने 56 व्या षटकात 23 धावांवर खेळणार्या टॉम हार्टलेनला क्लीन बोल्ड करत इंग्लंडला आठवा धक्का दिला.
एका बाजूने पडणार्या विकेटस्मध्ये स्टोक्सने संघर्षपूर्ण फलंदाजी केली. त्याने खालच्या फळीतील टॉम हार्टलीसोबत 38 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 200 च्या जवळ नेली. यानंतर त्याने मार्क वुडसोबत 9 व्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 31 वे अर्धशतक झळकावले आणि शेवटपर्यंत झुंज दिली. तो 88 चेंडूंत 70 धावा करून बाद झाला.
भारताचे दमदार प्रत्युत्तर
इंग्लंडच्या 246 धावांच्या प्रत्युत्तरात भारताला यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करून दिली. रोहित शर्मा एका बाजूने संयमी खेळ करत होता, तर यशस्वी चांगलेच फटके खेळताना दिसला. भारताने 41 चेंडूंत अर्धशतकी धावा फलकावर चढवल्या. ही जोडी तोडण्यासाठी इंग्लंडने त्यांचा अनुभवी फिरकीपटू जॅक लिच याला आणले, परंतु यशस्वीने त्यालाही झोडले. 13 व्या षटकात लिचने 80 धावांवर भारताला पहिला धक्का देताना रोहितला (24) माघारी पाठवले. पण, यशस्वी व शुभमन गिल ही जोडी उभी राहिली. भारताने दिवसअखेर 1 बाद 119 धावा केल्या.
हेही वाचा :
PIFF : पिफमध्ये ‘सिटीझन सेंट’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट
अंटार्क्टिकामध्ये एम्परर पेंग्विनच्या चार नव्या वसाहतींचा लागला शोध
Republic Day 2024 : कर्तव्यपथावर आज वैदर्भीय कलावंताचा राजमाता जिजाऊ, शिवरायांचा चित्ररथ
Latest Marathi News भारताची धावसंख्या दोन बाद 150 धावा पार Brought to You By : Bharat Live News Media.