दुबईहून पुण्यात तब्बल 3 कोटी 60 लाखांच्या सोन्याची तस्करी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईवरून तस्करी करून आणलेले तब्बल 6 किलो 912 ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआयला) पकडले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने जप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या तस्करी करून आणलेल्या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ही 3 कोटी 60 लाखांची आहे. यावेळी एका महिलेसह दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दुबईहून पुण्यात स्पाईस जेटमधून प्रवासी महिला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर झडती घेतली असता त्यांच्याकडून तब्बल 6 किलो 912 ग्रॅम सोन्याची पेस्ट पांढर्या बेल्टमध्ये व एका पाकिटात लपवून आणल्याचे अधिकार्यांच्या निदर्शनास आले.
Latest Marathi News दुबईहून पुण्यात तब्बल 3 कोटी 60 लाखांच्या सोन्याची तस्करी Brought to You By : Bharat Live News Media.