मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : आज संपूर्ण भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आपली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी प्रथमच अंमलात आली, ज्याला 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले हे सर्वज्ञात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज शुक्रवारी (दि.२६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वांना देशाच्या सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्य़ा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारत देश हा प्रगतीच्या वाटेवर नवी क्षितिजे पादाक्रांत करत असून त्यात सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा असेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी, पोलीस बांधव आणि कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील जनतेला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!#प्रजासत्ताकदिन #RepublicDay2024 pic.twitter.com/Iz36q4N3AV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 26, 2024
हेही वाचा
सिंधुदुर्ग : तोंडवळी-तळाशील नजीकच्या वाळू उत्खननावर ग्रामस्थ आक्रमक, प्रजासत्ताक दिनी खाडीपात्रात उपोषण
Emmanuel Macron In India : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात पोहोचले; जयपूरमध्ये राजस्थानी शैलीत स्वागत
Latest Marathi News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा Brought to You By : Bharat Live News Media.