वैज्ञानिकांनी बनवली सर्वात मजबूत, सूक्ष्म गाठ!
वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी धातूचा वापर करून जगातील सर्वात लहान आकाराची आणि सर्वात मजबूत, घट्ट अशी गाठ तयार केली आहे. त्यामध्ये केवळ 54 अणूंचा वापर झालेला आहे. सूक्ष्मदर्शकामधूनच पाहावी लागणारी ही गाठ ‘ट्रेफॉईल’च्या स्वरूपाची आहे. ‘नॉनट्राव्हिएल नॉट’चा हा सर्वात साधा प्रकार आहे. त्यामध्ये तीन क्रॉसिंग्ज असून, मोकळे टोक नाही.
याबाबतची माहिती ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. वेस्टर्न आँटॅरिओ युनिव्हर्सिटीतील रसायनशास्त्रज्ञ रिचर्ड पुडेफट यांनी याबाबतची माहिती दिली. मुळात संशोधक कार्बन स्ट्रक्चरला गोल्ड असेटायलिड्सशी जोडण्याचा प्रयत्न करीत होते. हे गोल्ड असेटायलिड म्हणजे एक प्रकारचे रासायनिक संयुग आहे. या प्रक्रियेवेळी ही तीन पानांसारख्या आकाराची गाठ तयार झाली. ‘ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया होती आणि हे नेमके कसे घडले, हे आम्हालाही समजले नाही’ असे पुडेफट यांनी सांगितले.
ही गाठ अत्यंत सूक्ष्म असण्याबरोबरच ती सर्वात घट्ट गाठही ठरली आहे. गाठीचा घट्टपणा हा ‘बॅकबोन-टू-क्रॉसिंग रेशो’ (बीसीआर)ने ठरवला जात असतो. त्यामधील सर्वात लहान गुण हे सर्वात मजबुती दर्शवतात. यापूर्वीच्या विक्रमातील ‘बीसीआर’ 24 होता. मात्र आताच्या गाठीचा ‘बीसीआर’ हा 23 आहे.
Latest Marathi News वैज्ञानिकांनी बनवली सर्वात मजबूत, सूक्ष्म गाठ! Brought to You By : Bharat Live News Media.