Pune : शहरात शेकोट्या पेटल्या ; किमान तापमान 8.6 अंशांवर

पुणे : उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे शहर, पिंपरी-चिंचवडसह पूर्ण जिल्हा गारठला आहे. या हुडहुडी भरलेल्या थंडीमुळे अखेर गुरुवारी (दि. 25) शेकोट्या पेटल्या असून, नागरिक उबदार कपडे परिधान करूनच बाहेर पडत आहेत किंवा घरी थांबणेच पसंत करीत आहेत. दरम्यान, हा गारठा महिनाअखेरपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गुरुवारी शहरातील हंगामातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद … The post Pune : शहरात शेकोट्या पेटल्या ; किमान तापमान 8.6 अंशांवर appeared first on पुढारी.

Pune : शहरात शेकोट्या पेटल्या ; किमान तापमान 8.6 अंशांवर

पुणे : उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे शहर, पिंपरी-चिंचवडसह पूर्ण जिल्हा गारठला आहे. या हुडहुडी भरलेल्या थंडीमुळे अखेर गुरुवारी (दि. 25) शेकोट्या पेटल्या असून, नागरिक उबदार कपडे परिधान करूनच बाहेर पडत आहेत किंवा घरी थांबणेच पसंत करीत आहेत. दरम्यान, हा गारठा महिनाअखेरपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गुरुवारी शहरातील हंगामातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद झाली असून (8.6 अंश सेल्सिअस), किमान तापमानात उणे 2.5 अंशांनी घट झाली आहे. शहरात एनडीए 7.6, तर जिल्ह्यात शिरूरमध्ये 7.4 अंश एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.
पुणे आणि परिसरात गेल्या आठ दिवसांपासून थंडीने हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली. गुरुवारी तर दिवसभर उन्हं असले तरी गारठा जाणवत होता. दुपारनंतर मात्र थंडी जाणवण्यास चांगलीच सुरुवात झाली, तर संध्याकाळी सातनंतर थंडीत आणखी वाढ झाली. या कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांनी शेकोट्या पेटविल्या तसेच उबदार कपडे परिधान करणे पसंद केले. दरम्यान, या कडाक्याच्या थंडीमुळे रात्रीची शहरातील वाहतूक थंडावली होती. रस्त्यावर अगदी रात्री उशिरासुद्धा वाहनांची गर्दी असते. मात्र, थंडीमुळेही वाहतूक कमी झाल्याचे दिसून आले. पुण्यात एनडीए भागात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. आठवडाभर शहरात थंडी राहणार आहे.
 
Latest Marathi News Pune : शहरात शेकोट्या पेटल्या ; किमान तापमान 8.6 अंशांवर Brought to You By : Bharat Live News Media.