ग्रँट रोडवरील रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, एकाचा मृत्यू
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा, ग्रँट रोड कामाठीपुरा येथील लाकडाच्या गोदामाला रात्री सुमारे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला असून इतर बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. (Mumbai)
यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले, की घटनास्थळावरील स्वच्छतागृहात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. जे. जे. रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला आहे.
अग्निशामक दलाचे चार पथक आणि सोळा गाड्या आग नियंत्रणात आणण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने घटनास्थळाच्या शेजारी असलेला एक मॉल आणि एक बहुमजली इमारत रिकामी करण्यात आली आहे. जवानांकडून इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
Latest Marathi News ग्रँट रोडवरील रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, एकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.