पोलीस निरीक्षक दोरगे, महिला हवालदार डोंगरीतोट यांना राष्ट्रपती पदक
सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे आणि विशेष शाखेतील महिला हवालदार सीमा डोंगरीतोट यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचार्यांना राष्ट्रपतींचे पदक केंद्रीय गृह विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे व विशेष शाखेतील महिला हवालदार सीमा डोंगरीतोट यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांनी आयुक्तालयाच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक गुन्हे उघडकीस आणून सर्वाधिक मुद्देमाल जप्त केला आहे. त्याशिवाय अनेक गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यातमध्ये दोरगे यांचा मोलाचा वाटा आहे.
पोलीस निरीक्षक दोरगे व महिला हवालदार डोंगरीतोट यांचे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त अजित बोर्हाडे, विजय कबाडे, डॉ. दिपाली काळे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
Latest Marathi News पोलीस निरीक्षक दोरगे, महिला हवालदार डोंगरीतोट यांना राष्ट्रपती पदक Brought to You By : Bharat Live News Media.