डीवायएसपी संकेत गोसावी यांना शौर्यपदक
कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर पोलिस दलातील करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत सतीश गोसावी यांना भारत सरकारने गुरुवारी शौर्यपदक जाहीर केले. २०१९ ते डिसेंबर २०२१ या काळात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहीम केलेल्या विशेष कामगिरीची दखल घेऊन त्यांना शौर्यपदकाने सन्मानित करण्यात येत आहे. गोसावी मूळचे कराड (जि. सातारा) येथील आहेत. ते २०१७ मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाले. २०१७ मध्ये धाराशिव जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक, २०१९ ते २०२१ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात, तर डिसेंबर २०२१ पासून करवीरचे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
Latest Marathi News डीवायएसपी संकेत गोसावी यांना शौर्यपदक Brought to You By : Bharat Live News Media.