सिंधुदुर्ग : वेंगुर्ले ग्रामपंचायतला प्रजासत्ताकदिनी विशेष बहुमान
वेंगुर्ले; Bharat Live News Media वृत्तसेवा : वेंगुर्ले तालुक्यातील परूळेबाजार ग्रामपंचायतीला विशेष बहुमान मिळाला आहे. स्वच्छाग्राही म्हणुन प्रेमा नारायण जाधव (रा. परळे गवाण) व खास निमंत्रित म्हणून माजी सरपंच प्रदीप प्रभू शुक्रवारी (दि.२६) दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी उपस्थित राहणार आहेत.
प्रेमा जाधव या ग्रामपंचायत परुळेबाजार अंतर्गत स्वच्छाग्रही म्हणून काम करीत आहेत. ग्रामपंचायतच्या विविध स्वच्छता विषयक अभियानात त्या नेहमी अग्रेसर असतात. महिला बचत ‘स्वयंसहायता गटाच्या त्या सदस्या असून उमेद अभियानांतर्गत त्या स्वत : काम करतात. बँकेमार्फत काथ्या मशीन घेऊन काथ्यापासून पायपुसणी व इतर वस्तु त्या स्वत: तयार करतात. आणि बचत गट महोत्सवात स्टॉल लावून त्यांची विक्री करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारतर्फे त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच माजी सरपंच प्रदीप प्रभूही खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा
Padma Awards : मोठी बातमी! पद्म पुरस्कारांची घोषणा, ३३ दिग्गजांना पद्मश्री जाहीर
Nashik News : पिंपळसोंड येथील बोहाडा मुखवटे कला झळकणार दिल्लीच्या राजपथावर
मराठी कलाकारांनी शेअर केल्या प्रजासत्ताक दिनाच्या खास आठवणी
Latest Marathi News सिंधुदुर्ग : वेंगुर्ले ग्रामपंचायतला प्रजासत्ताकदिनी विशेष बहुमान Brought to You By : Bharat Live News Media.