सोलापूर : अकलूजला आलेला गांजा फिल्मी स्टाईलने पकडत पोलिसांची कारवाई

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रचलेल्या सापळ्यात दोन कारसह १०५ किलो गांजा हस्तगत करण्यात यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांच्या पथकाने बुधवारी, माढा तालुक्यातील मोडनिंब जवळ ही लक्षवेधी कामगिरी पार पाडली. या छाप्यात दोन वाहनांसह ३६ लाख रुपयांहून अधिक … The post सोलापूर : अकलूजला आलेला गांजा फिल्मी स्टाईलने पकडत पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

सोलापूर : अकलूजला आलेला गांजा फिल्मी स्टाईलने पकडत पोलिसांची कारवाई

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रचलेल्या सापळ्यात दोन कारसह १०५ किलो गांजा हस्तगत करण्यात यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांच्या पथकाने बुधवारी, माढा तालुक्यातील मोडनिंब जवळ ही लक्षवेधी कामगिरी पार पाडली. या छाप्यात दोन वाहनांसह ३६ लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही टोळी हा गांजा ओरिसा राज्यातून अकलूजकडे जात होती, असेही चौकशीत पुढं आलं आहे.
कदीर आसिफ पठाण (वय २६, रा. आदर्श नगर मोहोळ) आणि प्रकाश संतोष बारटक्के ( वय २६, रा. तेलंगवाडी, ता. मोहोळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सोलापूर ग्रामीण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी, २४ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना मिळालेल्या खबरीनुसार मोडनिंब गावाच्या जाधववाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गोलाकार चौकात दुपारी दोनच्या नंतर त्यांच्याकडील वाहनाने काही इसम येणार असल्याची विश्वसनीय माहिती होती.
मारूती सुझुकी ब्रेझा, पांढरे रंगाची कार क्रमांक MH-45/N-6752 आणि रेनॉल्ट कंपनीची ट्रीबर, सिल्वर रंगाची कार क्रमांक MH-45/AQ-7821 मधून हे “गांजा” हे मादक अंमली पदार्थ ओरीसा राज्यातून घेऊन येऊन तो अकलूज येथे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती खात्रीशीर असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे व पोलीस अंमलदार यांना सतर्क केले.
गांजा या अंमली पदार्थावर छापा घालण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोनि सुरेश निंबाळकर यांनी पथकास मोंडनिंब गावातून जाधववाडी गावाकडे जाणारे रोडवरील गोलावर चौक येथे सापळा लावला. ती वाहने ही मोडनिंब गावाकडून गोलाकार चौकात येत असताना सापळा पथकाने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्या कारमधील चालकाने कार वेगाने अरण गावाकडे घेऊन पळून जाऊ लागले. त्यावेळी पो.नि. सुरेश निंबाळकर, सपोनि धनंजय पोरे व पथकाने त्या कारचा शासकीय वाहनाने पाठलाग करीत सुर्वे यांच्या वस्तीजवळ पळून जाणारे दोन्ही कार हे शासकीय वाहने आडवी लावून अडविण्यात आली.
त्यावेळी कारमधील ०२ इसमांना जागीच पकडण्यात आले, मात्र तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यातील मारूती सुझुकी ब्रेझा कार क्रमांक MH-45/N-6752 मध्ये एकूण १५ पाकीटे व ट्रीबर कार क्रमांक MH- 45/AQ-7821 मध्ये ३७ पाकीटे प्रत्येक पॉकेटमध्ये असणारे गांजाचे वजन २ किलोच्या आसपास असून ५२ पॉकेटमध्ये १०५ किलो ३८० ग्रॅम वजनाचा एकूण किंमती २१,०७,६०० रुपये व दोन्ही वाहनांची किंमत १५,००,००० रुपये असा एकूण ३६,०७,६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
हा अवैध “गांजा” हा मादक व नशाकारक अंमली पदार्थाची अवैधपणे विक्री करण्यासाठी ओरीसा येथून घेवून तो अकलूज येथे घेवून जात असताना मिळून आल्याने ५ आरोपीविरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील २ आरोपींना अटक करण्यात आलेली असून न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याच्या आदेश दिले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि धनंजय पोरे यांच्यासह सपोफौ श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर, म. इसाक मुजावर, पोहेकॉ/परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, पोकॉ विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, दिलीप थोरात, सतिश कापरे यांनी पार पाडली.
Latest Marathi News सोलापूर : अकलूजला आलेला गांजा फिल्मी स्टाईलने पकडत पोलिसांची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.