34 जागांवर महिलांचे मतदान पुरुषांहूनही अधिक!
भोपाळ; वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली असून या निवडणुकीत महिलांनी प्रचंड मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील 34 विधानसभा जागांवर पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त आहे, हे विशेष! लाडली बहना आणि नारी सन्मान योजनांमुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढल्याचे सांगण्यात येते.
आकडे बोलतात…
230 विधानसभा जागांवर 77.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
66 वर्षांतील हा उच्चांक आहे. 2018 मध्ये 75.63 टक्के मतदान झाले होते.
2018 मध्ये महिला आणि पुरुषांच्या मतदानातील फरक 2023 मध्ये जवळपास सारखा आहे.
1.95 टक्के फरक गेल्या निवडणुकीत (स्त्री-पुरुष मतांत) होता, तर यावेळी तो 2.18 टक्के आहे.
50 जागांवर गेल्या वेळी महिलांचे मतदान जास्त होते. यावेळी हा आकडा 35 आहे.
24 जागा (महिला मतदान अधिक झालेल्या) एकट्या विंध्य विभागातील आहेत.
‘या’ जागांवर महिलांची मतदान आघाडी
विंध्य : चित्रकूट, रायगाव, नागौड, मैहर, अमरपाटन, रामपूर बघेलन, सिरमौर, सेमरिया, ट्योनथर, मौगंज, देवतलाब, मंगवान, गुढ, चुरहट, सिधी, सिहवाल, चित्रांगी, धौहनी, बेओहारी, जयसिंगनगर, अननपूर, पुष्पराजगड, मानपूर.
महाकौशल : सिहोरा, बिछिया, निवास, मांडला, बैहार, लांजी, परसवाडा.
इतर जागा : भोपाळ दक्षिण-पश्चिम, पवई, पन्ना.
The post 34 जागांवर महिलांचे मतदान पुरुषांहूनही अधिक! appeared first on पुढारी.
भोपाळ; वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली असून या निवडणुकीत महिलांनी प्रचंड मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील 34 विधानसभा जागांवर पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त आहे, हे विशेष! लाडली बहना आणि नारी सन्मान योजनांमुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढल्याचे सांगण्यात येते. आकडे बोलतात… 230 विधानसभा जागांवर 77.15 टक्के मतदारांनी …
The post 34 जागांवर महिलांचे मतदान पुरुषांहूनही अधिक! appeared first on पुढारी.