लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येवून ठेपले…!

पनवेल; विक्रम बाबर : मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेले आंदोलनकर्ते आज अखेर मुंबईच्या वेशीवर येवून ठेपले आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबई शहरात आंदोलन करण्याचे जाहीर आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते. त्यानुसार काल (दि. २५) मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात हे आंदोलक दुपारी तीन वाजता पोहोचतील अशी … The post लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येवून ठेपले…! appeared first on पुढारी.

लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येवून ठेपले…!

पनवेल; विक्रम बाबर : मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेले आंदोलनकर्ते आज अखेर मुंबईच्या वेशीवर येवून ठेपले आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबई शहरात आंदोलन करण्याचे जाहीर आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते. त्यानुसार काल (दि. २५) मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात हे आंदोलक दुपारी तीन वाजता पोहोचतील अशी आशा होती, मात्र आंदोलन थांबवण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न होत असल्याचे दिसून आले.
आंदोलक लोणावळा मध्ये असताना सकाळ पासून जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अनेक शासकीय अधिकाऱ्याने केले, तसेच दिवस भरात आंदोलनाचे अनेक वेळा वाह तुकीत बदल देखील केले, यांचा परिणाम म्हणून लोणावळा शहराच्या बाहेर पडण्यासाठी मनोज जरागे पाटील आणि आंदोलकाना रात्रीचे आकरा वाजले, त्या मुळे पुढचे नियोजन कोलमडले दिसून आले , मात्र हे आंदोलक थांबले नाही पाटील यांच्या आगोदर काही आंदोलकांनी पाई तसेच आपली स्वतः ची वाहणे घेवून आंदोलक थेट मुंबई क्या वेशीला जावून थडकले आहेत, अनेक आंदोनकर्त्यां हे पनवेल मार्गाने वाशी येथे पोहचले तर काही आंदोलक हे थेट आझाद मैदानात पोह चल्याचे सांगितले जात आहे. त्या मुळे नवी मुंबई मधील सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोलमडली असून महामार्गावर वाहतूक कोडी होण्यास सुरवात झाली आहे. तर काही भागात वाहतूक ठप्पा झालेली पहायला मिळत आहे. तसेच काही आंदोलकांनी आज पनवेल मधील जे एन पी टी मार्गावर बसूनच जेवण्याचा आनंद लुटला आहे. सकाळ पासून जवळपास ५०० हून अधिक आंदोलकांची वाहणे वाशी येथे जावून थांबल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात येत आहे.
या सर्व आंदोलकाचे स्वागत नवी मुबई कामोठे कळंबोली तसेच खांदा कॉलनी वसा हती मधील मराठा बांधवांनी केले आहे. उशिरा रात्री पर्यंत आंदोलका साठी जेवण्याची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Latest Marathi News लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येवून ठेपले…! Brought to You By : Bharat Live News Media.