छ. संभाजीनगर : नांदर गावात चोरट्यांचा धुमाकूळ; चार ठिकाणी चोरी

पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पाचोड पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारून २४ तास होण्याआधीच नवीन पोलीस अधिकाऱ्यांची चोरट्यांनी डोकेदुखी वाढवली आहे. नांदर गावात बुधवारी (दि.२४) चार ठिकाणी चोरी करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. तीन ठिकाणी घरफोडी करीत चोरट्यांनी एका मंदिरची दानपेटी पळवली. यामुळे परिसरातील नागरिकांत घबराहट पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सध्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. दरम्यान पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांची बदली झाल्यामुळे बुधवारी (दि.२४) या ठिकाणी नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पदभार स्विकारला. पदभार स्विकारून २४ तास होण्याआधीच नांदर गावात बुधवारी(दि.२४) चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना घडली. चोरट्यांनी घरफोडी करीत अशोक तुकाराम पाटील, प्रताप भोसले, यासीन शेख यांच्या घरात चोरी केली. तसेच जैन मंदिरातील दानपेटी चोरून नेली. पाचोड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा :
Dhule Crime : अल्पवयीन बालकांच्या मदतीने केली घरफोडी, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Tractor accident : चालत्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हिंग सीटखाली दिसला साप! स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने भीषण अपघातात चालक जागीच ठार
Nashik Drugs News : मुंबईहुन थेट नाशिकमध्ये ड्रग्ज विक्री, पाच जणांना अटक
Latest Marathi News छ. संभाजीनगर : नांदर गावात चोरट्यांचा धुमाकूळ; चार ठिकाणी चोरी Brought to You By : Bharat Live News Media.
